‘बायको रागावली की अंथरूण ओलं करते…’ अक्षय कुमारचा पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल धक्कादायक खुलासा

अक्षय कुमारने आपल्या लग्नाचा एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. पत्नी ट्विंकल खन्ना रागावली की बेडवर पाणी ओतते, असं त्याने सांगताच रितेश-जेनेलिया थक्क झाले.

Published On: 

Akshay Kumar Funny Story : बायको रागावली की अंथरूण ओलं करते; अक्षयचा ट्विंकलबद्दल भन्नाट किस्सा

लग्न म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच आणि नवरा-बायकोमध्ये खटके उडणारच. पण भांडणानंतर बायको नेमकं काय करेल, याचा काही नेम नसतो. बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यासोबत तर जे घडतं, ते ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. पत्नी ट्विंकल खन्ना रागावली की ती आरडाओरडा करत नाही, तर चक्क अक्षयला झोपूच देत नाही. खुद्द अक्षयनेच आपल्या ‘बेडरूम सिक्रेट’चा हा भन्नाट किस्सा जगजाहीर केला आहे.

Akshay Kumar Funny Story

अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘द व्हील ऑफ फॉर्च्यून’ (The Wheel of Fortune) या नव्या शोमुळे चर्चेत आहे. या शोच्या पहिल्याच भागात त्याचे खास मित्र रितेश देशमुख आणि जेनेलिया हजेरी लावणार आहेत. प्रोमोमध्ये गप्पांचा फड रंगलेला असताना विषय लग्नाच्या वाढदिवसावर आला. रितेशने सांगितलं की त्याच्या लग्नाला १४ वर्ष झाली आहेत, तर अक्षयने अभिमानाने सांगितलं की त्याच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झालीत.

यावेळी ‘सॉरी’ कसं म्हणायचं यावर चर्चा सुरू असताना अक्षयने बॉम्ब टाकला. तो म्हणाला, “माझी बायको (ट्विंकल) थोडी वेगळी आहे. जेव्हा ती माझ्यावर चिडते, तेव्हा मला लगेच कळत नाही. पण जेव्हा मी रात्री थकून भागून झोपायला जातो, तेव्हा मला धक्का बसतो. माझ्या बेडची जी बाजू असते, त्यावर पाणी ओतलेलं असतं! पूर्ण अंथरूण ओलं झालेलं असतं.” अक्षयचं हे बोलणं ऐकून रितेश आणि जेनेलियाला हसू अनावर झालं.

अक्षयची ही ‘शिक्षा’ ऐकून सोशल मीडियावर नेटकरीही पोट धरून हसत आहेत. ट्विंकल खन्नाच्या सेन्स ऑफ ह्यूमरचे किस्से तसेही प्रसिद्ध आहेतच, पण नवऱ्याला अशी शिक्षा देणारी ती एकमेव स्टार पत्नी असावी.

हा मजेशीर एपिसोड आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) हा नवा शो २७ जानेवारीपासून सोनी टीव्हीवर रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे, अक्षय लवकरच ‘भूत बंगला’ आणि ‘वे वेलकम टू जंगल’ या सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही