Share

Budget 2026: शेतकऱ्यांना जॅकपॉट लागणार? पीएम किसानची रक्कम दुप्पट होणार?

यंदाच्या बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी १.५ लाख कोटींची तरतूद होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्यासह बोगस बियाण्यांवर कडक कारवाईचे संकेत मिळत आहेत.

Published On: 

Budget 2026 Expectations: शेतकऱ्यांसाठी १.५ लाख कोटींची तरतूद?

🕒 1 min read

शेतकऱ्यांच्या हातात नक्की काय पडणार? हा प्रश्न दरवर्षीच बजेटच्या आधी विचारला जातो. पण यंदाचं बजेट (Budget 2026) बळीराजासाठी खरोखरच ‘लॉटरी’ ठरू शकतं का? सध्या दिल्लीच्या वर्तुळात जी चर्चा सुरू आहे, ती ऐकून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी, १ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील आणि यावेळी कृषी क्षेत्रासाठी सरकार तिजोरीचं तोंड उघडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.

Budget 2026 Expectations

गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर कृषी क्षेत्रावरील सरकारचं लक्ष वाढल्याचं स्पष्ट होतं. २०१३-१४ मध्ये जे कृषी बजेट अवघं २१,९३३ कोटी होतं, ते गेल्या वर्षी १.२७ लाख कोटींवर पोहोचलं होतं. यंदा हे बजेट तब्बल १.५ लाख कोटींच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच कृषी योजनांना मोठा ‘बूस्टर डोस’ मिळू शकतो.

विशेषतः सर्वांच्या नजरा ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेकडे लागल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये मिळतात. मात्र, महागाई आणि वाढता उत्पादन खर्च पाहता, पीएम किसानचा हप्ता २,००० वरून थेट ४,००० रुपये केला जाऊ शकतो, अशी चर्चा जोरात आहे. जर असं झालं, तर शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा असेल. अर्थात, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, पण तज्ज्ञांच्या मते सरकार यावर गंभीर विचार करत आहे.

दुसरीकडे, शेतकऱ्यांची आणखी एक मोठी डोकेदुखी म्हणजे बोगस बियाणे. यावर लगाम घालण्यासाठी सरकार या अधिवेशनात ‘नवीन बियाणे बिल’ (New Seed Bill) आणण्याच्या तयारीत आहे. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर आता दयामाया दाखवली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास ३० लाखांपर्यंत दंड आणि ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, अशी कडक तरतूद या कायद्यात असू शकते.

यासोबतच, भारताची कृषी निर्यात (Export) ५०-५५ अब्ज डॉलर्सच्या घरात असली तरी, जागतिक बाजारपेठेतील टॅरिफच्या अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्यामुळे निर्यातीला चालना देण्यासाठी आणि मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी या बजेटमध्ये विशेष पॅकेजची घोषणा होऊ शकते. १ फेब्रुवारीला निर्मला सीतारामन यांच्या पोतडीतून शेतकऱ्यांसाठी नक्की काय निघतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या