Share

विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हेच भारताचे गेट वे ऑफ इंडिया; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

दावोसमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ३५ लाख नोकऱ्या आणि तिसऱ्या मुंबईचा मोठा प्लॅन सादर केला आहे. महाराष्ट्र २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनणार असल्याचे संकेत.

Published On: 

Devendra Fadnavis

दावोस – स्वित्झर्लंडच्या गोठवणाऱ्या थंडीत सध्या महाराष्ट्राच्या गुंतवणुकीची चर्चा मात्र चांगलीच तापली आहे. दावोसमध्ये जमलेल्या जगातील बड्या उद्योगपतींसमोर महाराष्ट्राने असं काही ‘मेन्यू कार्ड’ ठेवलंय की, ज्यामुळे राज्याचं नशीब पालटण्याची चिन्हं आहेत. राजकीय वर्तुळात अनेक चर्चा झडत असल्या तरी, देवेंद्र फडणवीस दावोस (Devendra Fadnavis At Davos) दौऱ्यातून राज्यासाठी एक मोठी ‘गुड न्यूज’ घेऊन आले आहेत. “परदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हेच भारताचं खरं गेटवे ऑफ इंडिया आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis At Davos

केवळ हवेतल्या घोषणा नाहीत, तर आकडेवारीच त्यांनी जगासमोर मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला की, नवी मुंबई विमानतळ परिसरात आता ‘तिसरी मुंबई’ आकार घेत आहे. इथे फक्त इमारती उभ्या राहणार नाहीत, तर एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडिसिटी असे प्रकल्प उभे राहतील. फडणवीसांच्या दाव्यानुसार, या एकाच पट्ट्यातून भविष्यात तब्बल ३५ लाख तरुणांना उच्च पगाराच्या (High Salary) नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

“आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो,” अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्राची बाजू मांडली. गेल्या वर्षी भारतात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी (FDI) ३९ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. इतर राज्यांत सामंजस्य करारांचे (MoU) रूपांतर २-३० टक्के होत असताना, महाराष्ट्रात हे प्रमाण ५०-५५ टक्के आणि दावोसच्या बाबतीत तर चक्क ७५ ते ८० टक्के असल्याचा दावा त्यांनी केला.

२०३२ पर्यंत महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल असं वाटत होतं, पण आताचा वेग पाहता हे स्वप्न २०३० मध्येच पूर्ण होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. वाढवण बंदरामुळे पुढील १०० वर्षांची सोय होणार असून, महाराष्ट्र आता देशाची ‘डेटा सेंटर कॅपिटल’ बनल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. आता हे अब्जावधींचे करार कागदावरून जमिनीवर कधी उतरतात आणि तरुणांच्या हाताला काम कधी मिळतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही