🕒 1 min read
स्वित्झर्लंडमधल्या कडाक्याच्या थंडीत सध्या महाराष्ट्राच्या गुंतवणुकीची चर्चा मात्र चांगलीच गरम झाली आहे. जगभरातील बडे उद्योगपती दावोसमध्ये जमले असतानाच, महाराष्ट्राने तिथे आपलं वजन पुन्हा एकदा सिद्ध केलंय. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी असा काही रोडमॅप मांडला आहे की, ज्यामुळे येत्या काळात राज्यात रोजगाराचा अक्षरशः पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Devendra Fadnavis At Davos
जागतिक मंचावरून बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis At Davos) यांनी स्पष्ट केलं की, परदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हेच भारताचं खरं ‘गेटवे ऑफ इंडिया’ आहे. केवळ घोषणा नाहीत, तर थेट आकडेवारीच त्यांनी समोर ठेवली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीतून तब्बल ३५ लाख तरुणांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, ते आता २०३२ ऐवजी २०३० मध्येच पूर्ण होईल, असा जबरदस्त विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई आणि पुण्यातली गर्दी आणि ताण पाहता, आता ‘तिसरी मुंबई’ वेगाने आकार घेत आहे. नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात ही नवी सिटी उभी राहतेय. इथे फक्त इमारती नसतील, तर ‘एज्यु-सिटी’, ‘इनोव्हेशन सिटी’, ‘स्पोर्ट्स सिटी’ आणि ‘मेडिसिटी’ असे भन्नाट प्रकल्प उभे राहणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांच राहणीमान आणि दळणवळण दोन्ही बदलणार असल्याचं चित्र आहे.
विशेष म्हणजे, ही गुंतवणूक फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही. नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीतही हजारो कोटींचा प्रकल्प येत आहे. सुरजागड इस्पात सारख्या प्रकल्पांमुळे विदर्भाचं नशीब पालटण्याची चिन्हे आहेत.
कोणी लावला पैसा? मोठी यादी समोर:
एसबीजी ग्रुप: मुंबईत २० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक आणि तब्बल ४.५ लाख रोजगार.
पंचशील रिअॅलिटी: २५ बिलियन डॉलर्सचा महाकाय प्रकल्प.
के. रहेजा कॉर्पोरेशन: १० बिलियन डॉलर्स आणि १ लाख रोजगार.
सुरजागड इस्पात: गडचिरोलीत २० हजार कोटींची गुंतवणूक.
राज्यात गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला असला तरी, या घोषणा प्रत्यक्षात कधी उतरणार आणि तरुणांच्या हाताला काम कधी मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ठाकरेंची भाजपसोबत ‘बॅक डोअर’ डील? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले…
- DCP खोटं बोलले की प्रोसेस अडकली? डॉ. पाटलांना नडलेली ‘LOC’ नक्की असते तरी काय? जाणून घ्या नियम!
- “लंडनमध्ये मुलं एकटी, नोकरीही वाऱ्यावर…” डॉ. संग्राम पाटलांचा एअरपोर्टवर आक्रोश; ‘एका पोस्टसाठी अजून किती छळणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











