Share

Gold Rate : एका दिवसात २५०० रुपयांचा भडका! सोनं दीड लाखांच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या नवा भाव!

सोन्याच्या भावात एका दिवसात २५०० रुपयांची मोठी वाढ झाली असून १० ग्रॅमचा भाव १,४६,००० च्या पुढे गेला आहे. लवकरच दीड लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता.

Published On: 

Gold Rate Today: सोनं महागलं! तोळ्याचा भाव १.४६ लाखांवर, मुंबईत आजचा दर काय?

Gold Rate : सोनं खरेदी करावं की नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक आहे. लग्नसराईच्या काळात दागिन्यांची खरेदी करण्याचं तुमचं प्लॅनिंग असेल, तर आता बजेट कोलमडण्याची चिन्हं आहेत. कारण, सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली असून, सामान्य माणसाच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. काही दिवसांपासून शांत असलेलं मार्केट अचानक तापलं आणि एकाच दिवसात भावात जी वाढ झालीये, त्यामुळे ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत.

Gold Rate Today

१९ जानेवारीला सोन्याचे भाव गगनाला भिडले. १८ जानेवारीच्या तुलनेत सोन्याच्या दरात जवळपास २५०० रुपयांची (प्रति १० ग्रॅम) वाढ झाली आहे. सोनं लवकरच दीड लाखांचा टप्पा गाठणार का? कारण सध्याची परिस्थिती पाहता हा आकडा फार लांब वाटत नाहीये. भारतात २४ कॅरेट सोन्याचा भाव आता १,४६,२४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. म्हणजेच, एका तोळ्यासाठी तुम्हाला आता दीड लाखांच्या घरात पैसे मोजावे लागणार आहेत.

बाजारातील चढ-उतारावर नजर टाकली तर, सोन्याच्या दरात (Gold Rate) मध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. १८ जानेवारीला जे दर होते, त्यात १९ जानेवारीला मोठी वाढ झाली.

२४ कॅरेट (शुद्ध सोनं): एका दिवसात २४६० रुपयांनी वाढून १० ग्रॅमचा भाव १,४६,२४० रुपयांवर गेला आहे. (१ ग्रॅम = १४,६२४ रुपये)

२२ कॅरेट (दागिन्यांचे सोनं): प्रति ग्रॅम भाव २२५ रुपयांनी वाढून १३,४०५ रुपयांवर पोहोचला आहे.

आर्थिक राजधानी मुंबईतही याचे पडसाद उमटले आहेत. मुंबईत २४ कॅरेटचा भाव १४,६२४ रुपये प्रति ग्रॅम, तर २२ कॅरेटसाठी १३,४०५ रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे १८ कॅरेट सोन्याचा भाव १०,९६८ रुपये प्रति ग्रॅम झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे ही दरवाढ झाली असून, चांदीचे दरही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ‘आत्ताच सोनं घ्यावं की वाट पाहावी?’ या संभ्रमात ग्राहक अडकले आहेत. दीड लाखांचा टप्पा ओलांडला तर सर्वसामान्यांसाठी सोनं हे फक्त स्वप्नच उरेल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही