Share

“हे काका कोण आहेत? मी यांना ओळखत नाही”, प्रसिद्ध अभिनेत्रीकडून शाहरुख खानचा अपमान?

प्रसिद्ध तुर्की अभिनेत्री हांडे एर्सेलने शाहरुख खानला ‘काका’ म्हणत ओळखत नसल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे.

Published On: 

Hande Erçel on SRK : शाहरुखला ‘काका’ म्हणणारी ती पोस्ट व्हायरल, हांडे एर्सेल ट्रोल

जगाच्या पाठीवर शाहरुख खानला (Shah Rukh Khan) ओळखत नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक असा प्रकार घडलाय ज्याने किंग खानचे चाहते अक्षरशः संतापले आहेत. रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखला चक्क एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं ‘काका’ (Uncle) म्हणत, “मी याला ओळखत नाही,” असा दावा केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तुर्कीची सुपरस्टार (हांडे एर्सेल) Hande Erçel आहे. तिच्या या एका पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

Hande Erçel on Shah Rukh Khan

रियाधमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘जॉय अवॉर्ड्स’मध्ये शाहरुखने हजेरी लावली होती. तिथे त्याचा सन्मानही करण्यात आला. या सोहळ्यात तुर्की अभिनेत्री हांडे एर्सेल देखील उपस्थित होती. एका व्हायरल व्हिडिओमध्ये ती स्टेजच्या दिशेने आपला फोन धरून व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसली. सुरुवातीला चाहत्यांना वाटलं की ती सुद्धा शाहरुखची ‘फॅन गर्ल’ निघाली आणि किंग खानला कॅमेऱ्यात कैद करत आहे.

हांडेने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यात तिने शाहरुख आणि तिची मैत्रीण अमिना खलीलचा फोटो पोस्ट केला. पण त्याखाली लिहिलेलं कॅप्शन वाचून नेटकऱ्यांचा पारा चढला. तिने लिहिलं, “हे काका कोण आहेत? मी यांना ओळखत नाही. मी फक्त माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ काढत होते.” तिने पुढे असंही नमूद केलं की ती शाहरुखची चाहती नाही.

नेटकऱ्यांचा हल्लाबोल आणि संभ्रम ही पोस्ट व्हायरल होताच शाहरुखच्या चाहत्यांनी हांडेला ट्रोल करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, याआधी याच अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. “जिथे बॉलिवूडमध्ये काम करायचंय, तिथेच किंग खानला ओळखत नाही?” असा सवाल आता नेटकरी विचारत आहेत.

असं असलं तरी, या प्रकरणाला दुसरी बाजूही आहे. जोरदार ट्रोलिंगनंतर हांडे एर्सेलने ती पोस्ट डिलीट केल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे, काही फॅन पेजेसचा असा दावा आहे की हा फोटो मॉर्फ केलेला असून ती पोस्ट फेक (Fake) आहे. अद्याप याबद्दल हांडे कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे नेमकं सत्य काय? याबाबत संभ्रम कायम आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही