IND vs NZ : टीम इंडियाला विजयानंतरही मोठा झटका! ‘हा’ हुकमी एक्का रक्ताच्या थारोळ्यात?

भारताने न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव केला, पण उपकर्णधार अक्षर पटेलला गंभीर दुखापत झाल्याने वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

Published On: 

Axar Patel Injury : विजयानंतर टीम इंडियाला धक्का! अक्षर पटेलला गंभीर दुखापत, World Cup पूर्वी टेन्शन वाढलं

तुम्ही सामना जिंकता, सीरिजमध्ये आघाडी घेता, पण ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर आनंदाऐवजी चिंतेच वातावरण असेल तर? नागपूरमध्ये टीम इंडियासोबत असंच काहीसं घडलंय. भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत पहिला टी-20 सामना खिशात घातला खरा, पण या विजयासाठी रोहितच्या सेनेला मोठी किंमत मोजावी लागली आहे. संघाचा उपकर्णधार आणि महत्त्वाचा ऑलराऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) गंभीर जखमी झाला असून, त्याच्या दुखापतीने वर्ल्ड कपच्या तोंडावर सर्वांचीच झोप उडवली आहे.

Axar Patel Injury

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर धावांचा पाऊस पडला. भारताने दिलेलं २३९ धावांचं डोंगराएवढं आव्हान पाहूनच किवींची घाबरगुंडी उडाली होती. न्यूझीलंडचा डाव १९० धावांत आटोपला आणि भारताने ४८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, खरी खळबळ उडाली ती १५ व्या ओव्हरमध्ये! अक्षर पटेल बॉलिंग करत असताना डॅरेल मिचेलने समोरच्या दिशेने एक जोरात फटका मारला.

हा वेगवान चेंडू रोखण्याच्या नादात अक्षरने हात घातला आणि तिथेच घात झाला. चेंडू थेट त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (Index Finger) आदळला. फटका इतका भीषण होता की अक्षरच्या बोटाला गंभीर इजा झाली आणि मैदानातच रक्त येऊ लागलं. अक्षरला वेदनेने कळवळताना पाहून फिजिओ धावत आले, पण रक्त थांबत नसल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. अक्षरची ती ओव्हर पूर्ण करण्यासाठी अभिषेक शर्माला बॉलिंग करावी लागली, यावरूनच दुखापतीचं गांभीर्य लक्षात येतं.

दुसरीकडे, आयसीसी टी-20 वर्ल्ड कप २०२६ आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच फॉर्ममध्ये असलेल्या उपकर्णधाराला दुखापत होणं, हे शुभसंकेत नक्कीच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षरच्या बोटाचं स्कॅनिंग केलं जाईल आणि त्यानंतरच तो पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल की नाही, हे स्पष्ट होईल. रायपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात अक्षर खेळणार की विश्रांती घेणार, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही