Share

‘रात्रीस खेळ चाले’ फेम ‘शेवंता’चं गुपचूप दुसरं लग्न! ८ वर्षांच्या संसारानंतर शिवसेनेच्या नेत्याला का सोडलं? समोर आलं ‘हे’ मोठं कारण

‘रात्रीस खेळ चाले’ फेम अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारीला दुसरं लग्न करत चाहत्यांना धक्का दिला आहे. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तिने पहिल्या पतीला का सोडलं, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Published On: 

Apurva Nemlekar Wedding: 'शेवंता'चं दुसरं लग्न! पतीचा फोटो आला समोर

‘रात्रीस खेळ चाले’ मधली ‘शेवंता’ आठवतेय ना? आपल्या जीवघेण्या अदांनी तिने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. पण आता हीच ‘शेवंता’ म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर तिने चाहत्यांना असा काही सुखद धक्का दिलाय की, सोशल मीडियावर नुसती खळबळ उडाली आहे.

होय, अपूर्वाने दुसरं लग्न केलं आहे. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तिने तनुज गोवलकरसोबत (Tanuj Govalkar) नवीन आयुष्याची सुरुवात केली. इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत तिने हे ‘मोठं गुपित’ फोडलं.

Apurva Nemlekar Wedding

तिने अतिशय भावूक पोस्ट लिहिली आहे, “मी आता श्रीमती अपूर्वा तनुज गोवलकर आहे. आयुष्याने माझी खूप परीक्षा घेतली, मी खचले… पण प्रेमावरचा विश्वास कधीच उडाला नाही.” तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असला तरी, अनेकजण अवाक झाले आहेत.

या आनंदाच्या बातमीसोबतच चर्चा रंगलीये ती तिच्या पहिल्या लग्नाची. हे अपूर्वाचं दुसरं लग्न आहे. याआधी २०२४ मध्ये तिने रोहन देशपांडेसोबत (Rohan Deshpande) लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे, लग्नाआधी ते दोघे तब्बल ८ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. इतकी वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं होतं.

रोहन देशपांडे हे नाव राजकीय वर्तुळात परिचयाचं आहे. ते शिवसेनेचे पदाधिकारी असून दादरमध्ये सक्रिय असतात. मात्र, ८ वर्षांची मैत्री आणि प्रेम असूनही लग्नानंतर त्यांचा संसार फार काळ का टिकला नाही? याचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘आयुष्यातील अनेक वादळांनंतर मला शांतता मिळाली’, या अपूर्वाच्या वाक्यावरून पहिल्या लग्नात नक्कीच काहीतरी बिनसलं होतं, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install