🕒 1 min read
मुंबई– हाताला चेंडू लागला तरी तो मैदानावर टिकून राहिला, पण आता रोहित शर्मा पुढच्या सामन्यातून थेट बाहेर पडणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या वनडे आधीच टीम इंडियात मोठ्या बदलांची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
उद्या, १७ जून रोजी लखनऊच्या इकाना स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता केवळ मालिका विजय हेच लक्ष्य नाही, तर पुढच्या वर्ल्ड कपसाठी नवी फळी तयार करण्यावर संघ व्यवस्थापनाचा भर आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.
IND vs AFG 2nd ODI
पहिल्या वनडेत फलंदाजी करताना रोहित शर्माच्या मनगटाला चेंडू लागला होता. त्याने उपचार घेऊन खेळ सुरू ठेवला, पण धावताना त्याला स्पष्टपणे त्रास होत होता आणि अखेर तो धावबाद झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितच्या दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेता त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. रोहित खेळला नाही तर त्याच्या जागी थेट यशस्वी जैस्वालला संधी मिळेल. जैस्वालने याआधीही बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरल्यावर नाबाद शतक ठोकण्याचा पराक्रम केलाय. त्यामुळे तो पुन्हा एकदा संधीचे सोने करण्यास सज्ज असेल.
दुसरीकडे गोलंदाजीतही चुरस पाहायला मिळतेय. आयपीएल २०२६ आणि कसोटीतील खराब फॉर्ममुळे अनुभवी कुलदीप यादवला पहिल्या सामन्यात बाहेर बसावे लागले. त्याच्या जागी संधी मिळालेल्या हर्ष दुबेने पहिल्याच सामन्यात ३ विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे फिरकीची धुरा पुन्हा दुबेकडेच राहण्याची चिन्हे आहेत.
तसेच, लखनऊच्या खेळपट्टीचा चांगला अनुभव असलेला प्रिंस यादव उद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात एकही विकेट न मिळवू शकलेल्या प्रसिद्ध कृष्णाच्या जागी प्रिंसला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे उद्या भारतीय संघ नव्या दमाने आणि नव्या चेहऱ्यांसह मैदानात उतरेल.
IND vs AFG 2nd ODI – शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा / यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा / प्रिंस यादव.
📌 महत्वाच्या बातम्या
- कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने भररस्त्यात दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, सरकारला दिला गंभीर इशारा
- संजय निरुपम यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ऑपरेशन टायगर’मुळे २०२९ पर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना संपणार
- तुकाराम मुंढेंचा दणका: मुंबईत स्तनांचा आकार वाढवणाऱ्या खोट्या उत्पादनांवर धाड, राज्यात कोट्यवधींचा माल जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











