Share

तुकाराम मुंढेंचा दणका: मुंबईत स्तनांचा आकार वाढवणाऱ्या खोट्या उत्पादनांवर धाड, राज्यात कोट्यवधींचा माल जप्त

तुकाराम मुंढे यांच्या सूचनेनुसार एफडीएने मुंबई आणि कराडमध्ये छापे टाकून स्तनांचा आकार वाढवण्याचा दावा करणारी लाखो रुपयांची बोगस उत्पादने जप्त केली आहेत.

Published On: 

FDA Raid in Mumbai Tukaram Mundhe action on fake cosmetic products

मुंबई– बाजारात मिळणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांवर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवताय का? असेल तर वेळीच सावध व्हा. स्तनांचा आणि नितंबांचा आकार वाढवण्याचे खोटे दावे करणारी बोगस उत्पादने सध्या राजरोसपणे विकली जात आहेत. पण आता अन्न व औषध प्रशासन अशा भामट्यांच्या मुसक्या आवळत आहे.

राज्याच्या एफडीएची सूत्रे तुकाराम मुंढे यांच्या हाती आल्यापासून धडक कारवाया सुरू झाल्या आहेत. शनिवारी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये एफडीएच्या पथकाने छापा टाकला. तिथे ब्रेस्ट एन्लार्ज, बट एन्हान्समेंट आणि फॅट बर्नर अशा जाहिराती करणारी उत्पादने मोठ्या प्रमाणावर सापडली. धक्कादायक बाब म्हणजे यावर कोणताही बॅच नंबर किंवा परवाना क्रमांक नव्हता.

Tukaram Mundhe ॲक्शन मोडमध्ये

क्रॉफर्ड मार्केटमध्ये एक लाख रुपयांचा माल जप्त केल्यानंतर पथकाने कांदिवलीकडे मोर्चा वळवला. तिथे कोणत्याही वैध परवान्याशिवाय सौंदर्यप्रसाधने आणि औषधे बनवली जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारखान्यातून कच्चा माल आणि यंत्रांसह सुमारे ३.९७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे कराडमध्येही मोठी कारवाई पाहायला मिळाली. तिथे तब्बल २९.४५ लाख रुपयांचा औषधांचा आणि प्रसाधनांचा साठा एफडीएने सील केलाय. या मालावर साधे लेबल किंवा उत्पादनाची तारीखही नव्हती. दरम्यान लातूरमध्ये खवा आणि मिठाईच्या दुकानांची तपासणी झाली. तिथे सुदैवाने कोणताही भेसळयुक्त माल पथकाला आढळला नाही. मुंढेंच्या या धडक मोहिमेमुळे आता भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही