🕒 1 min read
Maharashtra Monsoon– अर्धा जून महिना संपला तरी मान्सूनचा पत्ता नाही, यामुळे तुमचीही चिंता वाढलीये का? एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने चांगलीच दडी मारली असून, राज्यावर मोठ्या पाणीबाणीचे ढग दाटून आले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याच गंभीर परिस्थितीवर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन दिवस पावसाची कोणतीही शक्यता नाही. म्हणजेच २० जूननंतरच मान्सूनची दमदार हजेरी पाहायला मिळू शकते.
Maharashtra Monsoon El Nino Impact
पाऊस लांबल्याने धरणांमधील पाणीसाठा वेगाने तळ गाठत आहे. सध्या राज्यात केवळ २४.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात हाच आकडा ३१.१० टक्के होता. ही आकडेवारीच भविष्यातील संकटाचे गांभीर्य स्पष्ट करते.
पाणीटंचाईची ही झळ आता मुंबईसारख्या मोठ्या शहरांनाही बसण्याची चिन्हे आहेत. अधिकृत सूत्रांनुसार, आगामी काळात मुंबईत २० टक्क्यांपर्यंत पाणीकपात लागू करण्यावर गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे बनले आहे.
दुसरीकडे, पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची चिंता आणखी वाढली आहे. मात्र, दुबार पेरणीचा मोठा आर्थिक फटका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. पावसाचा योग्य अंदाज आल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असा स्पष्ट सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतर पुन्हा बदलीची चर्चा, ग्राहक पंचायतीचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- ‘भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून…’; पत्रिकेतून शिंदेंचं नाव वगळताच प्रकाश महाजनांचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
- कल्पना खरातला उच्च न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












