Share

मान्सूनची वाटचाल रखडली! महाराष्ट्रावर एल निनोचं सावट, पेरण्यांचं काय होणार?

अरबी समुद्रात मान्सून रखडल्याने महाराष्ट्रात पावसाला आणखी विलंब होणार आहे. एल निनोच्या सावटामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.

Published On: 

Maharashtra Monsoon - Dry agriculture fields due to delayed rain

पुणे – जून महिना अर्धा संपला तरी आकाशात ढगांचा पत्ता नाही, हीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर महाराष्ट्रावर दुष्काळाचं मोठं संकट ओढवेल का? सध्या तरी हवामानाचं चित्र फारसं आशादायक दिसत नाहीये.

साधारण १५ जूनपर्यंत राज्याला व्यापून टाकणारा मान्सून (Monsoon) अजूनही अरबी समुद्रातच अडकून पडला आहे. अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे त्याच्या वाटचालीत मोठा अडथळा निर्माण झाला असून, २० जूनपर्यंतही तो राज्यात दाखल होण्याची शक्यता आता बरीच धूसर झाली आहे.

मान्सून अपडेट: एल निनोच्या प्रभावाने वाढवली चिंता

प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. जगभरातील हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, या एल निनोचा थेट फटका महाराष्ट्रातील पावसावर पडू शकतो. त्यामुळेच मान्सून सध्या जिथे आहे, तिथेच थांबल्याचे पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे, शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेत. पेरणीची सगळी तयारी झाली असली, तरी जोरदार पाऊस झाल्याशिवाय बियाणं मातीत न टाकण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. जून महिना असाच कोरडा गेला तर पिण्याच्या पाण्याचा आणि दुबार पेरणीचा मोठा प्रश्न उभा राहील.

सध्या देशातील काही राज्यांत मान्सून सक्रिय झाला असला तरी महाराष्ट्राला अद्याप प्रतीक्षाच आहे. काही हवामान अभ्यासकांच्या मते, २२ जूनच्या आसपास राज्यात पावसाला सुरुवात होऊ शकते. पण तोपर्यंत बळीराजाचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही