🕒 1 min read
शिर्डी- व्याजाने घेतलेले ३ कोटी रुपये व्याजासह प्रामाणिकपणे परत करूनही स्वतःचीच शेतजमीन मिळवण्यासाठी एका व्यक्तीला पोलिसांत का धाव घ्यावी लागली? शिर्डीतील या धक्कादायक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट आला आहे.
फसवणूक प्रकरणात अडकलेल्या कल्पना अशोक खरात (Kalpana Kharat) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने जोरदार दणका दिला आहे. अटकेची टांगती तलवार असल्याने त्यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने ठोस पुराव्यांच्या आधारे थेट फेटाळून लावला आहे.
Kalpana Kharat Shirdi Crime News
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपींकडून २ टक्के मासिक व्याजाने ३ कोटी रुपयांचं मोठं कर्ज घेतलं होतं. या कर्जासाठी हमी म्हणून फिर्यादीची शेती कल्पना खरात यांच्या नावावर लिहून घेण्यात आली. कर्ज आणि व्याजाचे सर्व पैसे परत करूनही जमीन नावावर करण्यास नकार दिल्याने हे प्रकरण शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचलं.
न्यायालयात सुनावणीवेळी कल्पना खरात यांनी अत्यंत अजब दावा केला. “मी केवळ मुख्य आरोपीची पत्नी असल्याने मला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे, माझा या आर्थिक व्यवहाराशी काहीही थेट संबंध नाही,” असं त्यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, सरकारी वकिलांनी त्यांचे हे दावे खोडून काढत भक्कम पुरावे सादर केले. जमिनीच्या खरेदीखतावर खुद्द कल्पना खरात यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिवाय, त्यांच्या बँक खात्यात झालेले व्यवहार पाहता त्यांना या बेकायदेशीर प्रकरणाची पूर्ण माहिती असल्याचं तपासात उघड झालं आहे.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक तथ्ये लपवली, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यामुळे या गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आता त्यांची पोलीस कोठडीत चौकशी होणं अटळ मानलं जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पवनराजे हत्याकांड: ‘खून केल्याने विरोधक संपत नसतो’; निकाल लांबणीवर पडताच ओमराजे निंबाळकरांची संतप्त प्रतिक्रिया
- पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लांबणीवर; पद्मसिंह पाटलांचा फैसला कधी?
- मान्सूनची वाटचाल रखडली! महाराष्ट्रावर एल निनोचं सावट, पेरण्यांचं काय होणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












