Share

संजय निरुपम यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ऑपरेशन टायगर’मुळे २०२९ पर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना संपणार

ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान संजय निरुपम यांनी मोठा दावा केला आहे. नेत्यांचा विश्वास उडाल्याने २०२९ पर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे संपेल, असे ते म्हणाले.

Published On: 

Operation Tiger Maharashtra Sanjay Nirupam predicts end of Uddhav Thackeray Shiv Sena

🕒 1 min read

मुंबई – एकामागून एक धक्के पचवणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना आता खरोखरच शेवटच्या घटका मोजत आहे का? सध्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरु असून, याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे संजय निरुपम यांनी एक मोठा दावा केला आहे.

शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. २०२९ पर्यंत उबाठा (UBT) पक्ष पूर्णपणे संपेल, असा दावा निरुपम यांनी एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे. त्यामुळेच आता राजकारण चांगलंच तापलं आहे.

‘ऑपरेशन टायगर’ अन् ठाकरे सेनेला गळती?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे ९ पैकी तब्बल ७ खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. या संभाव्य राजकीय भूकंपालाच ‘Operation Tiger’ म्हटलं जातंय. यावर बोलताना निरुपम म्हणाले की, उबाठा पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. त्यांचे लोक दररोज पक्ष सोडत आहेत. लोक हळूहळू त्यांची साथ पूर्णपणे सोडतील आणि हा पक्ष संपेल.

दुसरीकडे, मंत्री आशिष जैसवाल यांनी यावर थेट बोलणे टाळले. पण त्यांनी दिलेले संकेत बरेच काही सांगून जातात. जोवर खासदार अधिकृत प्रवेश करत नाहीत, तोवर बोलणं योग्य नाही, असं ते म्हणाले. जर कुणाला वाटत असेल की एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा खरा वारसा चालवत आहेत, तर ते स्वतःच्या मतदारसंघासाठी आणि राजकीय भविष्यासाठी नक्कीच निर्णय घेऊ शकतात, असं सूचक विधान जैसवाल यांनी केलं. आता खरोखरच हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का आणि आकड्यांचं गणित कसं जुळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही