Share

“शेरनी अगर शांत है, तो …!” नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका

माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्यसभेच्या खासदारकीला आपणच ठोकर मारल्याचा मोठा दावा केला असून, ‘शेरनी शांत असली तरी…’ म्हणत विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.

Published On: 

Navneet Rana speaking at a public event in Amravati criticizing Uddhav Thackeray

अमरावती– एखादा नेता साध्या नगरसेवकपदासाठीही लाळ घोटत असताना, कुणी थेट राज्यसभेच्या खासदारकीवर पाणी सोडू शकतं का? अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी असाच एक मोठा दावा करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

अमरावतीमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा यांनी काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. खासदारकी गेल्याच्या वेदना नक्कीच आहेत, पण आपण शांत बसलो नसल्याचा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.

Navneet Rana: ‘माझा स्वाभिमान मोठा, राज्यसभेला ठोकर मारली’

विरोधकांचा समाचार घेताना राणा म्हणाल्या की, “लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, पण माझा स्वाभिमान अटळ आहे. मी माझ्या विचारांशी पक्की असल्यानेच राज्यसभेसाठी कुणाच्याही दारात गेले नाही, उलट त्या संधीला मी ठोकर मारली.” महिलांबाबत बोलताना विरोधकांनी मर्यादा पाळायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला. “शेरनी अगर शांत है, तो डहाडना कभी भूलती नहीं,” या त्यांच्या वाक्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

दुसरीकडे, नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. हनुमान चालीसा पठणावरून झालेल्या अटकेची आठवण काढत त्या म्हणाल्या की, ४० अंश तापमानात जेलमधील ते १४ दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. सत्तेत असताना त्यांना हनुमान चालिसा नको होती. पण जशी सत्ता गेली आणि पक्ष बरबाद झाला, तेव्हा त्यांना रामाची आणि हनुमानाची आठवण आली.

मुख्यमंत्री असतानाच जर त्यांनी हनुमान चालीसा वाचली असती, तर आज पक्ष आणि घर फुटण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. सोबतच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार रवी राणा यांच्या कायम पाठीशी असल्याने या मतदारसंघाचा विकास अजिबात थांबणार नाही, असा विश्वासही राणा यांनी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही