मुंबई – एखादा उप-मुख्यमंत्री दुसऱ्या केंद्रीय नेत्याच्या इशाऱ्यावर एका पायावर किंवा थेट डोक्यावर उभा राहू शकतो का? काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असाच एक खळबळजनक आणि बोचरा हल्ला चढवला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या विधानामुळे आता चांगलंच राजकारण तापलं आहे. कन्हैया कुमार यांनी शिंदेंच्या राजकीय अस्तित्वावर आणि स्वाभिमानावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Eknath Shinde vs Kanhaiya Kumar
कन्हैया कुमार यांनी जाहीरपणे टीका करताना म्हटले की, एकनाथ शिंदे यांचे स्वतःचे असे कोणतेही अस्तित्व उरलेले नाही. अमित शहा यांनी फोन करून जर त्यांना एका पायावर किंवा डोक्यावर उभे राहण्यास सांगितले, तर ते लगेच उभे राहतील.
त्यामुळेच महाराष्ट्राचा गौरवशाली मराठा इतिहास विसरून शिंदे आज दिल्लीश्वरांच्या चरणी शरण गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या विधानानंतर महायुती आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
कन्हैया कुमार म्हणाले की, “ज्यांचं स्वतःचं असं काहीच अस्तित्व नाही, त्यांच्यावर काही बोलण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे यांचं काय आहे? अमित शहा त्यांना आता फोन करतील आणि एका पायावर उभं राहायला सांगतील, तर ते एका पायावर उभे राहतील. त्यानंतर जर त्यांनी डोक्यावर उभं राहायला सांगितलं, तर ते डोक्यावरही उभे राहतील. या माणसाचं काही राजकीय अस्तित्व उरलंय का? यांच्यात काही स्वाभिमान आहे का? या माणसाला थोडी तरी लाज वाटते का?
या देशाला एक गौरवशाली मराठा इतिहास आहे. त्या राजकारणातून पुढे आलेला हा माणूस आज अमित शहांच्या चरणी शरण गेला आहे. आणि ज्यांच्यासमोर हे शरण गेले आहेत, ते स्वतः ट्रम्प यांच्यासमोर शरण गेले आहेत. अशा लोकांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्याची अजिबात गरज नाही.”
📌 महत्वाच्या बातम्या
- पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तारीख ठरली, रोहित पवारांनी शेअर केलेली ‘ती’ पत्रिका चर्चेत
- रिलायन्स जिओचा बाजारात मोठा धमाका, रिचार्जवर मिळणार 20 GB पर्यंत फ्री डेटा; कोणते आहेत प्लॅन्स?
- लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात जूनचे पैसे कधी येणार? एक मोठी अपडेट समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











