विनायक राऊतांच्या अडचणीत मोठी वाढ, सुनेनेच केले खळबळजनक आरोप; डोक्याचे केस कापले अन्…

विनायक राऊत यांच्या कुटुंबावर सून गिरीजा राऊत यांनी अघोरी कृत्य आणि कौटुंबिक छळाचे गंभीर आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Published On: 

Vinayak Raut daughter in law Girija Raut files FIR for domestic violence in Thane.

राजकारणात नेहमी दुसऱ्यांवर तोफ डागणाऱ्या नेत्याच्या घरातच जेव्हा अघोरी प्रकारांचे आरोप होतात, तेव्हा धक्का बसणे साहजिकच आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या घरात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, त्यांच्याच सुनेने सासरच्यांविरुद्ध थेट पोलिसांत धाव घेतली आहे.

विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत (Gitesh Raut) (मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक) आणि संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vinayak Raut News

सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा गुन्हा केवळ कौटुंबिक हिंसाचाराचा नाही, तर थेट ‘जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत’ नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. सासरच्यांनी आपला अमानुष छळ केला, घरात बळजबरीने गोमूत्र पाजले, इतकेच नाही तर अत्यंत क्रूरपणे डोक्यावरील केसही कापले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या जादूटोण्याच्या प्रकारात फिरोज बाबा आणि काजी बाबा या दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

राजकीय कार्यक्रमांमध्ये अडचण नको म्हणून सासरे विनायक राऊत आणि सासू शामल राऊत यांच्या सांगण्यावरून मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या खाण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जायचा, असा मोठा गौप्यस्फोटही गिरीजा यांनी केला.

पती गितेश हा पाळीच्या तारखांची नोंद ठेवून विकृतपणे वागायचा. दर महिन्याला पाळी लांबवल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाताना ‘आमचे संबंध सुरळीत असून आम्ही बेबी प्लॅन करत आहोत’ असेच सांगण्याची धमकी पतीकडून दिली जायची.

वांद्रे येथील एका महिला डॉक्टरांनी या गोळ्या थांबवण्याचा सल्ला दिल्यावर गितेशने शिवीगाळ करत दमदाटी केल्याचेही समोर आले आहे. आता या खळबळजनक आरोपांवर विनायक राऊत किंवा ठाकरे गटाकडून काय स्पष्टीकरण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही