Supriya Sule vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे कॉपी करून उत्तीर्ण झाले असून आताचे राज्य सरकारही कॉपी करून आलेल्यांचे सरकार आहे. या सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला फक्त फसवले असून आरक्षणाचे सतत गाजर दाखवत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला.
सध्याचे राज्य सरकार कधीही महागाई, बेरोजगारी अथवा भ्रष्टाचारावर बोलत नाही. फक्त आणि फक्त विरोधकांवर टीका करणे एवढेच या सरकारचे काम आहे. देवेंद्र फडणवीस हे कॉपी करून उत्तीर्ण झाले असून आताचे राज्य सरकारही कॉपी करून आलेल्यांचे सरकार आहे.
आपल्यावर कितीही टीका झाली, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण नेहमी लढत राहू. त्यासाठी आपले निलंबन झाले तरी चालेल. पण, शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभेत आपण सातत्याने आवाज उठवत राहू.
महत्वाच्या बातम्या