सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक एकवटले

Sunetra Pawar पुणे : महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीने कंबर कसली आहे. एकेकाळचे राजकीय विरोधक असलेले माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, बाबा जाधवराव आणि अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी रविवारी पुरंदरमध्ये संयुक्त दौरा करत प्रचार केला. शिवतारे यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध करत निवडणूक लढविण्याची घोषणा … Read more

Published On: 

Sunetra Pawar पुणे : महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीने कंबर कसली आहे. एकेकाळचे राजकीय विरोधक असलेले माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, बाबा जाधवराव आणि अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी रविवारी पुरंदरमध्ये संयुक्त दौरा करत प्रचार केला.

शिवतारे यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध करत निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर शिवतारे हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.

तसेच उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर, इंदापूर, खडकवासला, भोर आणि दौंड अशा तालुक्यांमधील जुन्या-जाणत्या नेत्यांची भेट घेत आहेत. पवार यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाचवेळा निवडून आलेले माजी राज्यमंत्री दादा जाधवराव यांची भेट घेतली.

त्यानंतर त्यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबाराजे जाधवराव हे देखील सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. रविवारचा मुहूर्त साधत पुरंदर तालुक्यात महायुतीचे सर्व नेते एकवटले होते. त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली. शिवतारे, बाबा जाधवराव आणि जय पवार यांनी संयुक्त दौरा केला. पुरंदर तालुक्यातील मांडकी येथून हा दौरा सुरू झाला. पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही