ज्यांनी लोकसभा निवडणुकीत मुलाला पाडलं, त्यांच्याच प्रचारासाठी अजित पवारांनी काढली रॅली

Ajit Pawar | आज आपण जे चित्र बारामती लोकसभा मतदार संघात बघत आहोत तसेच प्रचाराचे चित्र २०१९ च्या मावळ लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले होते. मुलाला म्हणजेच पार्थ पवारांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी यथार्थ प्रयत्न केले होते, पण पवारांच्या पदरी निराशाच पडली.

पार्थ पवारांना मावळ मधून उमेदवारी देण्यास शरद पवारांचा विरोध असताना अजित पवारांनी पार्थ यांना लोकसभेची उमेदवारी दिली. यानंतर पवार कुटूंबातील अंतर्गत कलह ही काही काळ समोर आला होता.

पार्थ बद्दल बोलताना शरद पवार म्हणाले होते की, ”पार्थ पवारांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे.” असे व्यक्तव्य पवारांनी मुलाच्या संदर्भात केल्याने अजित पवार ( वडील ) आणि सुनेत्रा पवार ( आई ) नाराज झाले होते. आता जी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट दिसते आहे त्याची सुरवात येथूनच झालेचे बोलले जाते.

आता पाच वर्षानंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली असून अजित पवार हे महायुतीत सामील झालेत. महायुतीकडून मावळ मतदारसंघातून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे उभे आहेत, तर खुद्द अजित पवारच बारणेंचा प्रचार करत असल्याचे चित्र आहे.

कोण पार्थ पवार? असा सवाल करणाऱ्या खासदार बारणे यांचा प्रचार अजित पवार करत असल्याने ‘दादा’ आता ‘थंड’ झाल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुलाच्या विरोधात प्रचार केला म्हणून विजय शिवतारे यांना इशारा देऊन अजित पवारांनी पुरंदर विधानसभा मतदार संघातून पराभूत केले.

यावरूनच आता रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. आमदार रोहित पवार म्हणाले, ‘पार्थ तुझ्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आम्ही अजूनही लढत आहोत, परंतु मुलाचा पराभव करणाऱ्यांच्या विजयासाठी अजित पवार आले. ते कोणत्या पातळीवर गेलेत,” असे रोहित पवार म्हणाले.

मावळ लोकसभेनंतर अजित पवारांनी प्रतिष्ठेची केलेली बारामती लोकसभेच्या निवडणुकीत काय होणार? कि २०१९ ची पुनर्वती होणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महायुतीकडून श्रीरंग बारणे (Shrirang barne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून उबाठाच्या संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे. लढत सोपी नसली तरी अवघड नक्कीच नाही, असा विश्वास अर्ज दाखल करताना संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.