Gopichand Padalkar | “माझी औकात काढणाऱ्यांना मी बारामतीत जाऊन…”; पडळकर नेमकं काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gopichand Padalkar | औरंगाबाद : अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आता उफाळून आला आहे. पडळकर यांनी नाशिकमध्ये बोलताना अजित पवार व शरद पवार यांच्यांवर जोरदार टीका केली होती. यावर बोलताना अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

“गोपीचंद पडळकरच्या टीकेला उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही. बारामतीत त्याचं डिपॉझिट जप्त करून घरी पाठवलंय. त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही”, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. उपटसुंभ लोंकांना उत्तरं द्यायला माझ्याकडे वेळ नाही असंही पवार म्हणालेत.

अजित पवार यांच्या या वक्तव्यावर उत्तर देत गोपीचंद पडळकर यांनी जोरदार सडकून टीका केली आहे. “माझी औकात काढणाऱ्यांना मी बारामतीत जाऊन उत्तर देईन. जिथे इंदिरा गांधीचा पराभव झाला होता, तिथे अजित पवार किस झाड की पत्ती”, अशा शब्दात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalka) यांनी पवारांना आव्हान दिले.

पुढे ते म्हणाले, “पवार कुटुंबाला मी पुरून उरलेलो आहे, अजित पवारांकडे सध्या उत्तर नाही. मी त्यांचं सरकार असताना त्यांना सळो की पळो करुन सोडलं, मी त्यांना योग्य वेळी उत्तर देईन. राष्ट्रवादी काॅंग्रेसचा चेहरा उघड करण्याचे काम आणि माझे कर्तव्य आहे, ते मी करत आहे. धनगर, ओबीसी समाजाला न्याय मिळू नये हीच राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाची भूमिका राहिलेली आहे.

महत्वाच्या बातम्या :