Ajit Pawar | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद देखील चांगलाच पेटलेला दिसत आहे. पडळकर यांनी नाशिकमध्ये बोलताना अजित पवार व शरद पवार यांच्यांवर जोरदार टीका केली होती. यावर बोलताना अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
“गोपीचंद पडळकरच्या टीकेला उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही. बारामतीत त्याचं डिपॉझिट जप्त करून घरी पाठवलंय. त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही”, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. उपटसुंभ लोंकांना उत्तरं द्यायला माझ्याकडे वेळ नाही असंही पवार म्हणालेत.
गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य काय?
पडळकर म्हणाले होते की, ५० वर्षे तुम्ही राज्य केलात. कुणालाही चाळीस वर्ष दिलं तर तो जिल्ह्याचा विकास करेल. यांनी फक्त बारामतीचाच विकास केला. तुम्ही एक हजार कोटी राज्य सरकारचे नेता. तुमच्याकडं तिजोरी दिली आहे. ती गडप करू नका. ती राज्याची तिजोरी आहे. तुमच्याकडं एका विश्वासानं राज्यानं दिली.
“शरद पवार जाणते नाहीतर नेणता राजा आहेत. यावरती सर्व लोकांचा आक्षेप आहे. पण, राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील लोकांना चाटूगिरी करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते ठासून बोलतात. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात जोरात काम सुरु आहे. त्यामुळे शरद पवारांची फडणवीसांबरोबर तुलना होऊ शकत नाही. पवारांचा तीन-साडेतीन जिल्ह्यांतील पक्ष आहे. पवारांचं उभं आयुष्य गेलं, पण तीन अंकी आकडा पार करत आला नाही.”
महत्वाच्या बातम्या :
- Ravi Rana | “अरविंद सावंत यांच्या टीकेला गंभीरतेने घेण्याची गरज नाही”; रवी राणांचा खोचक टोला
- Jasprit Bhumrah | टेस्ट मॅच महत्वाची की IPL?, बुमराहने ‘या’ कसोटीतून घेतली माघार
- Ambadas Danve | “जज साहब तारीख तो मिल रही पर इंसाफ…”; अंबादास दानवे यांची सत्तासंघर्षावर खोचक प्रतिक्रिया
- Ajit Pawar | राष्ट्रवादीत अमोल कोल्हे नाराज? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले…
- IND vs SL | इशान किशनला संघात स्थान न दिल्याने माजी खेळाडू संतापला, म्हणाला…
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले