Ajit Pawar | राष्ट्रवादीत अमोल कोल्हे नाराज? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई: शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय शिबिराला अमोल कोल्हे अनुपस्थित होते. त्याचबरोबर गुजरात निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांच्या यादी मधून त्यांचे नाव वगळण्यात आलं होतं. त्यानंतर अमोल कोल्हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

यानंतर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काहीतरी झालं आहे, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काही काळानंतर या चर्चा थांबल्या होत्या. दरम्यान, मुंबईमध्ये झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व खासदार आणि महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीत अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यामुळे या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले आहे, “अमोल कोल्हे गेल्या काही दिवसांपासून शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याच्या प्रयोगामध्ये व्यस्त आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते नाशिकमध्ये आहेत. ते आजच्या बैठकीला अनुपस्थिती राहतील, याबाबत त्यांनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कल्पना दिली होती.”

“अमोल कोल्हे नाटकाच्या कामांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ते आज गैरहजर आहे. अमोल कोल्हे पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या खोट्या आहेत,” असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या