IND vs SL | इशान किशनला संघात स्थान न दिल्याने माजी खेळाडू संतापला, म्हणाला…

IND vs SL | गुवाहाटी: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. गुवाहाटीच्या मैदानावर या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. या सामन्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. संघ व्यवस्थापनाने या सामन्यांमध्ये इशान किशन (Ishan Kishan) च्या जागी शुभमन गिल (Shubhaman Gill) ला संधी दिली आहे. या निर्णयावर भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद म्हणाले, “यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर हा अन्याय आहे. बांगलादेशविरुद्ध द्विशतक केल्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळायला हवी होती.” व्यंकटेश प्रसाद यांनी रोहित शर्मा आणि व्यवस्थापनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

क्रिकट्रॅकरच्या ट्विटला टिपणी देत व्यंकटेश प्रसाद यांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणाले आहे, “व्यवस्थित नीट आणि बरोबर विचार करा. पहिले दोन सामने आणि मालिका गमावल्यानंतर द्विशतक करणाऱ्या खेळाडूला संधी मिळाली पाहिजे. गिलसाठी जगात खूप वेळ आहे, मात्र द्विशतक करणाऱ्या खेळाडूला तुम्ही वगळू शकत नाही.”

गुवाहाटी येथे सुरू होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला, “दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. पण दोन्ही खेळाडूंनी ओपनिंग करताना जी कामगिरी केली आहे ती लक्षात घेऊनच शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये गेली नाही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.