🕒 1 min read
Oscar 2023 | टीम महाराष्ट्र देशा: विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट 2022 मध्ये यशस्वी ठरला होता. चित्रपट काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट ऑस्कर 2023 (Oscar 2023) साठी शॉर्टलिस्ट झाला आहे. भारतातून ऑस्करसाठी पाच चित्रपट निवडले गेले आहे. या पाच चित्रपटांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे नाव आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले आहे, “द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ऑस्कर 2023 च्या पहिल्या यादीत शॉर्टलिस्ट झाला आहे. भारतामधील शॉर्टलिस्ट झालेल्या पाच चित्रपटांपैकी हा चित्रपट एक आहे. चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हे एक उत्तम वर्ष आहे.”
https://twitter.com/vivekagnihotri/status/1612699170787430403?s=20&t=X6N0xqbB2HarVE7YQNwzYg
‘द काश्मीर फाईल’ या चित्रपटासोबतच या चित्रपटातील कलाकार देखील ऑस्कर 2023 साठी निवडण्यात आले आहे. पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि अनुपम खेर या कलाकारांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या श्रेणीमध्ये निवड करण्यात आली आहे. “ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला आणखी दूरच टप्पा गाठायचा आहे.” असं देखील विवेक अग्निहोत्री म्हणाले.
द काश्मीर फाईल हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अनेक कलाकारांचा समावेश होता. यामध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान, या चित्रपटावरून बराच वादविवाद झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- Arvind Sawant | “तोच दाढीवाला आज फडणवीसांच्या मांडीवर…”; अरविंद सावंतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- Hair Care Tips | केसांना लांब आणि चमकदार बनवण्यासाठी बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Sanjay Raut | “‘धर्मवीर’ चित्रपट आनंद दिघेंवर नव्हता, तर…”; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
- Amruta Fadanvis | उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- Hyundai Car Launch | 6 एअरबॅग आणि खास सेफ्टी फीचर्ससह ह्युंडाईची ‘ही’ कार झाली लाँच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now