Arvind Sawant | “तोच दाढीवाला आज फडणवीसांच्या मांडीवर…”; अरविंद सावंतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Arvind Sawant | अमरावती : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल अमरावतीत ‘मशाल यात्रे’दरम्यान आयोजित सभेत बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार जोरदार टीकास्र सोडले. फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून मी कसा बसू? म्हणणारे आज त्याच देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसलेत, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनीच उद्धव ठाकरेंना २०१४ मध्ये भाजपाबरोबर सत्तास्थापन करण्याची मागणी केली होती. हे उद्धव ठाकरेंना तेंव्हाही मान्य नव्हतं. केवळ मिंधे लोकांसाठी त्यांनी पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीवेळी मी प्रचाराला व्यासपीठावर होतो. तेव्हा याच दाढीवाल्या बाबाने मोठी नाटकं केली होती, एक मोठा अर्ज लिहून आणला होता.”

“‘साहेब, आपल्या सामान्य माणसांची कामं होत नाहीत. गरिबांना न्याय मिळत नाही. यांच्या मांडीला मांडी लावून मी कसा बसू? माझा राजीनामा घ्या’, असं ते म्हणाले होते. मात्र, तोच दाढीवाला बाबा आज देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसला आहे”, असं म्हणत अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

“कोणी आमदार, खासदार गेले म्हणजे शिवसेना खच्ची झाली हा भ्रम आहे. त्याचं उत्तर आज मोर्चातून मिळेल. शिवसेना ही शिवसैनिकांची आहे. शिवसैनिक जसा आहे तसा आहे. पालापाचोळा उडतो. हेमंत ऋतू आल्यावर. नवी पालवी फुटते. नवीन मुलं आमच्याकडे येत आहेत”, असा दावाही अरविंद सावंत यांनी यावेळी बोलताना केला.

महत्वाच्या बातम्या :