Share

Hair Care Tips | केसांना लांब आणि चमकदार बनवण्यासाठी बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

🕒 1 min read Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच लांब आणि चमकदार केस (Hair) हवे असतात. यासाठी लोक अनेक पर्याय वापरून बघतात. पण काही केल्या केसांवर कुठल्याही पर्यायाचा परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही बेसनाचा वापर करू शकतात. होय! बेसनाच्या वापराने फक्त चेहरा नाही तर केसांची देखील काळजी घेता येते. कारण बेसनामध्ये … Read more

Published On: 

🕒 1 min read

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच लांब आणि चमकदार केस (Hair) हवे असतात. यासाठी लोक अनेक पर्याय वापरून बघतात. पण काही केल्या केसांवर कुठल्याही पर्यायाचा परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही बेसनाचा वापर करू शकतात. होय! बेसनाच्या वापराने फक्त चेहरा नाही तर केसांची देखील काळजी घेता येते. कारण बेसनामध्ये अँटी इम्प्लिमेंटरी, अंटीबॅक्टरियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे बेसनाच्या वापराने केस निरोगी आणि मजबूत राहू शकतात. केसांना निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी बेसनाचा पुढील पद्धतीने वापर करावा.

केसांना (Hair) लांब आणि चमकदार बनवण्यासाठी बेसनाचा पुढील  पद्धतीने करा वापर

बेसन आणि अंडी

अंडी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतात. अंड्यामध्ये माफक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असतात. त्यामुळे अंड्याच्या नियमित वापराने केस निरोगी राहतात. बेसन आणि अंड्याच्या मदतीने केसांना मजबूत बनवण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसन घेऊन त्यामध्ये एक अंडा फोडून मिक्स करून घ्यावा लागेल. त्यानंतर या मिश्रणामध्ये तुम्हाला एक चमचा मध आणि एक चमचा लिंबू मिसळून घ्यावे लागेल. हे सर्व मिश्रण एकत्र झाल्यावर तुम्हाला ते तुमच्या टाळूला आणि केसांना लावावे लागेल. साधारण अर्धा तास हे मिश्रण केसांना ठेवून तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुवावे लागतील. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने कोरडेपणाची आणि कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.

बेसन आणि दही

बेसन आणि दही केसांना लावल्याने केस लांब आणि चमकदार होऊ शकतात. बेसन आणि दही यांचे मिश्रण केसांना लावल्याने केस दाट, लांब आणि मुलायम होतात. हे मिश्रण तयार करण्यासाठी तुम्हाला दोन चमचे दही आणि दोन चमचे बेसन घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण 30 मिनिटे केसांना लावून ठेवावे लागेल. मिनिटानंतर तुम्हाला तुमची केस कोमट पाण्याने धुवावे लागतील.

बेसन आणि मेथी पावडर

बेसन आणि मेथी पावडर केसांना लावल्याने केस मजबूत आणि चमकदार होऊ शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसन घेऊन त्यामध्ये एक चमचा मेथी पावडर आणि एक चमचा खोबरेल तेल मिसळावे लागेल. या सर्व गोष्टी एकत्र मिसळून त्यांची चांगली पेस्ट बनवल्यानंतर तुम्हाला ते केसांवर लावून ठेवावे लागेल. साधारण 30 मिनिटे तुम्हाला हे मिश्रण केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला सामान्य पाण्याने केस धुवावे लागतील.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या