Sanjay Raut | “‘धर्मवीर’ चित्रपट आनंद दिघेंवर नव्हता, तर…”; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आनंद दिघेंच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर’ चित्रपटावरून टीकास्त्र सोडले आहे. ‘धर्मवीर’ चित्रपट आनंद दिघेंवर नव्हता, नंतर कळालं की तो चित्रपट एकनाथ शिंदेवरच होता, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

धर्मवीर’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे, याबद्दल संजय राऊतांनी भाष्य केलं. “धर्मवीर एकमध्ये आनंद दिघे यांचं निधन झाल्याचं दाखवलंय, मग दुसऱ्या भागात काय दाखवणार? आता दुसऱ्या भागात नवीन धर्मवीर कोण ते पाहायला मिळेल,” असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढला आहे.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाबत पार पडलेल्या सुनवाईबाबत बोलताना संजय राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकावर चांगलाच हल्लाबोल देखील केला आहे. ते म्हणाले “आम्ही सर्व प्रकारच्या लढाईला तयार आहे. गेल्या सहा महिन्यापासून राज्यात घटनाबाह्य सरकार आले आहे. जे सरकार भष्टाचार करत आहे. जे निर्णय घेत आहे ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचे नाहीत.”

“शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी सांगितले आहे, या देशात लोकशाही न्याय व्यवस्था आहे की नाही महाराष्ट्राबाबत जो निकाल लागेल त्यावरून स्पष्ट होईल. आमची बाजू सत्याची आहे, आम्हाला सत्याच्या पलीकडे काहीही नको आहे. सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आले, पैशाचा वारेमाफ वापर झाला, पक्षात फुट पाडली आणि खोकेबाज सरकार आले. आम्ही पहिल्या दिवसापासून न्यायालयात लढाई लढत आहोत, निवडणूक आयोगाकडे न्याय मागत आहोत, आणि यामध्ये आमच्याच बाजूने निकाल लागेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.