Hyundai Car Launch | 6 एअरबॅग आणि खास सेफ्टी फीचर्ससह ह्युंडाईची ‘ही’ कार झाली लाँच

Hyundai Car Launch | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दरवर्षी लाखो अपघात होतात. या अपघातामध्ये लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागतात. या अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर हे अपघात टाळण्यासाठी कार उत्पादक कंपन्या आपल्या कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर आणि एअर बॅग उपलब्ध करून देत असतात. अशा परिस्थितीमध्ये देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी ह्युंडाईने सिक्स एअर बॅगने सुसज्ज असलेली आपली नवीन Hyundai Grand i10 Nios हॅचबॅक कार लाँच केली आहे. नवीन Grand i10 Nios मध्ये चार स्टॅंडर्ड एअरबॅग आणि सहा ऑप्शनल एअरबॅग पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर या कार मध्ये अनेक सेफ्टी फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

फीचर्स

Grand i10 Nios या कारमध्ये क्रूझ कंट्रोल, एलईडी टेल लॅम्प्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), ESC, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC), चाइल्ड सीट अँकर (ISOFIX), फास्ट यूएसबी चार्जर (टाइप-सी) इत्यादी फीचर उपलब्ध आहेत.

इंजिन

Hyundai Grand i10 Nios या कार मध्ये पूर्वीच्या मॉडेलचे इंजिन बसवण्यात आलेले आहे. फक्त या नवीन कारमध्ये डिझेल इंजिन सुरू ठेवण्यात आलेली नाही. यामध्ये 1.2L कप्पा पेट्रोल, AMT सह 1.2L कप्पा पेट्रोल आणि CNG सह 1.2L कप्पा पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहेत.

कंपनीने ही कार उत्तम सुरक्षा फीचर्ससोबत तयार केली आहे. त्यामुळे या कारची किंमत जास्त असणे अपेक्षित आहे. कंपनीने या कारचे बुकिंग सुरू केले आहे. कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन किंवा जवळच्या डीलरशिपला भेट देऊन ग्राहक 11,000 रुपयांच्या टोकन रकमेसह ही कार बुक करू शकतात.

महत्वाच्या बातम्या