Sharad Pawar | शरद पवार यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! उजव्या डोळ्यावर होणार शस्त्रक्रिया

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये पुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

शरद पवार यांना उद्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. डॉक्टरांनी त्यांना 18 जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांच्या एका डोळ्यावर आधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांच्या दुसऱ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत खालवल्यामुळे दोन ते तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. दरम्यान, तब्येत बरी नसताना देखील शरद पवार शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी शिबिराला उपस्थित होते. त्यानंतर ते पुन्हा रुग्णालयामध्ये आले होते.

नोव्हेंबर आधी मार्च महिन्यात शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पित्ताशयाचा त्रास झाला होता. तेव्हा सुद्धा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.