Share

Electric Scooter | 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर, सिटी ड्राईव्हसाठी आहेत सर्वोत्तम

🕒 1 min read Electric Scooter | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत चालला आहे. वाहन उत्पादक कंपन्या आपल्या कंपनीचे बेस्ट इलेक्ट्रिक मॉडेल बाजारामध्ये सादर करत आहेत. कारण वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर ही … Read more

Published On: 

🕒 1 min read

Electric Scooter | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत चालला आहे. वाहन उत्पादक कंपन्या आपल्या कंपनीचे बेस्ट इलेक्ट्रिक मॉडेल बाजारामध्ये सादर करत आहेत. कारण वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल माहिती सांगणार आहोत. या स्कूटर बाजारामध्ये पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. बाजारामध्ये पुढील इलेक्ट्रिक स्कूटर कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे.

Bounce Infinity E1

Bounce Infinity E1 ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. भारतीय बाजारामध्ये या स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या स्कूटरमध्ये तीन रायडिंग मोड उपलब्ध आहे. यामध्ये ड्रॅग, इको आणि पॉवर या रायडिंग मोडचा समावेश आहे. ही स्कूटर पॉवर मोडमध्ये 65 किमी स्पीड देऊ शकते. ही स्कूटर एका चार्जर 65 किमी अंतर कापण्यास सक्षम आहे. याची बॅटरी चार्ज होण्यास तब्बल चार तास लागतात. या स्कूटरची किंमत 45009 रुपये आहे.

Ampere Reo Elite

Ampere Reo Elite या स्कूटरमध्ये अनेक आकर्षक फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये एलईडी डिजिटल डॅशबोर्ड, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, ड्युअल कॉइल स्प्रिंग शॉक शोषक आणि USB चार्जिंग पोर्ट इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ही स्कूटर सिटी ड्राईव्हसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 43,000 रुपयांपासून सुरू होते.

Komaki X1

भारतीय बाजारामध्ये ही स्कूटर 45,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Komaki X1 इलेक्ट्रिक स्कूटर 85kms च्या प्रभावी रेंजसह भारतीय बाजारात उपलब्ध आहे. Komaki X1 ची ही इलेक्ट्रिक स्कूटर 60W मोटरद्वारे चालवली जाते.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Cars And Bike Technology

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या