Devendra Fadanvis | “उद्धव ठाकरे चुकीचं वागले नसते तर एकनाथ शिंदे…”; सत्तांतराबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadanvis | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होणार असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं होतं पण ते मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री झाले. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खुलासा केला आहे.

“महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं त्यासाठी मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. कारण उद्धव ठाकरे हे जर चुकीचं वागले नसते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तींचा श्वास शिवसेनेत गुदमरला नसता”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे.

पुढे ते म्हणाले, “हा जो वेगळा प्रयोग झाला त्या प्रयोगात मी मुख्यमंत्री होणार नाही हे मला पहिल्या दिवसापासून माहित होतं. मी उपमुख्यमंत्री होणार हे माझ्यासाठी सरप्राईज होतं. तो निर्णय मला त्या दिवशी देण्यात आला. मला घरी जा सांगितलं असतं तरीही मी गेलो असतो. पण मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं. त्यामुळे सुरूवातीला मी थोडे आढेवाढे घेतले पण पक्षाचा निर्णय मी मान्य केला.”

त्याचबरोबर “मी सरकारच्या बाहेर राहूनच पक्ष मजबूत करायचं असं ठरवलं होतं. मात्र आमच्या नेत्यांनी मला उपमुख्यमंत्री व्हायला शेवटच्या क्षणी सांगितलं. मी पक्षाचा एक सैनिक आहे. त्यावेळी निश्चित माझ्या मनात थोडं वाटून गेलंच. पण पक्षाने सांगितलेला आदेश मोठा आहे त्यापुढे काहीही नाही. म्हणून मी पक्षाचा निर्णय स्वीकारला”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button