Share

रोहित शर्मा निवृत्त होणार? विराट कोहलीचा उदास चेहरा चर्चेत

रोहित शर्माच्या संभाव्य एकदिवसीय निवृत्तीच्या चर्चांदरम्यान विराट कोहलीचा उदास फोटो व्हायरल झाल्याने क्रिकेटविश्वात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Published On: 

IND vs ENG

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेचा अंतिम सामना लॉर्ड्सवर होणार आहे. सध्या ही मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने, लॉर्ड्सवरील सामना निर्णायक ठरणार आहे. मात्र, हा सामना रोहित शर्मासाठीही (Rohit Sharma) अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण अशी चर्चा आहे की ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची एकदिवसीय मालिका असू शकते. या बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच, रोहित शर्मा २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग नसेल, असेही वृत्त समोर आले आहे, ज्यामुळे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही बातमी वेगाने पसरताच सर्वांचे लक्ष कार्डिफ मैदानातील ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीकडे लागले. २६ धावा काढून रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर काही वेळातच, अर्धशतक पूर्ण केलेला विराट कोहली (Virat Kohali) तिथे आला आणि त्याच्या शेजारी बसला. भारतीय संघ फलंदाजी करत असताना, विराट कोहली निराश चेहऱ्याने रोहित शर्माच्या शेजारी बसलेला दिसला. तिथे उपस्थित असलेल्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चेहऱ्यावरील भावही खूप काही सांगून जात होते. रोहित शर्माच्या संभाव्य निवृत्तीमुळेच विराट कोहलीचा मूड उदास असावा, असा अंदाज चाहते लावत आहेत.

आर. अश्विनच्या निवृत्तीची आठवण

विराट कोहलीचा उदास चेहरा पाहून क्रिकेट चाहत्यांना या वर्षाच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या. अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. ब्रिस्बेन येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान त्याने ही घोषणा केली होती. या घोषणेपूर्वी, तिसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी ड्रेसिंग रूममधील विराट कोहली आणि आर. अश्विन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळीही, अश्विनला मिठी मारण्यापूर्वी विराट कोहली अशाच प्रकारे निराश दिसत होता. त्या व्हिडिओनंतर असा दावा केला गेला होता की, कोहलीला अश्विनच्या निवृत्तीबद्दल आधीच कल्पना होती आणि त्यामुळेच तो भावूक झाला होता.

विराट कोहलीच्या निराशेचे कारण काय?

व्हायरल झालेल्या फोटोवरून क्रीडाप्रेमी विविध तर्कवितर्क लावत आहेत. अनेकांना वाटते की, दीर्घकाळापासून सोबत असलेला सहकारी खेळाडू निवृत्त होत असल्यामुळे विराट भावूक झाला आहे. दरम्यान, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाची पुनर्बांधणी केली जात आहे आणि ही प्रक्रिया आगामी वर्षभरात पूर्ण होणे आवश्यक आहे. रोहित शर्माचा सध्याचा फॉर्म, त्याची तंदुरुस्ती आणि टीम इंडियाकडे उपलब्ध असलेले इतर पर्याय पाहता, त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच वाटते. रोहित शर्मा खरोखरच लॉर्ड्सवर आपला अखेरचा सामना खेळतो की निवृत्तीबाबतच्या या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळतो, हे पाहणे रंजक ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही