मुंबई: संसदेचे पावसाळी अधिवेशन जवळ येत असताना, राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत, आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्याबाबत महत्त्वपूर्ण दावे केले असून, त्यातून संभाव्य नवीन राजकीय समीकरणांचे संकेत मिळत आहेत. आगामी अधिवेशनात एनडीए (NDA) सरकार तीन महत्त्वाची विधेयके मांडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या वाढत्या राजकीय हालचालींची चर्चा रंगली आहे.
या परिस्थितीवर भाष्य करताना आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुढील १५ दिवसांत पुन्हा एकत्र येऊ शकतात. “सुप्रिया सुळे राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सांभाळतील, तर सुनेत्रा पवार राज्य स्तरावर कामकाज पाहतील. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपदही मिळू शकते,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
रवी राणा यांनी शिवसेनेबाबतही एक महत्त्वपूर्ण विधान केले. उद्धव ठाकरे यांनी प्रभू राम आणि हनुमान चालिसाचा स्वीकार केल्याचे नमूद करत ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील एका महिन्यात पुन्हा एकत्र येऊ शकतात. राजकारणात अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात.”
दरम्यान, रवी राणा यांच्या या दाव्यांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, संबंधित पक्षांनी या दाव्यांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे, आगामी काळात राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने वळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘3 Idiots’ आणि सोनम वांगचुक यांचा काही संबंध नाही; आमीर खानचे स्पष्ट वक्तव्य
- ड्रायव्हिंग लायसन्स काढणार? मग ‘हे’ प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- महिलांना मोठा धक्का! महाराष्ट्रात मोफत साडी योजना बंद; 25 लाख कुटुंबांवर परिणाम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











