Share

‘राज्याची बदनामी तुमच्या भ्रष्टाचारानं केली’; नाना पटोलेंची फडणवीस सरकारवर घणाघाती टीका

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या खर्च आणि दर्जावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

Published On: 

Nana Patole

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि राज्य सरकारवर (State Govt) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्सप्रेसवे) ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संताप व्यक्त केले आहे. राज्याची बदनामी नैसर्गिक आपत्तींमुळे नाही, तर भ्रष्टाचारांमुळे होत आहे, असे नाना पटोले यांनी विधानसभेत ठामपणे सांगितले.

पुढे नाना पटोले पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “‘मिसिंग लिंक’संदर्भात आज पण सांगितलं आहे की, निसर्गाने पाप उघडं केलं आहे. या प्रकल्पावर प्रति किलोमीटर ५४० कोटी खर्च केले आहेत. इतका खर्च केला तर ‘मिसिंग लिंक’ प्रोजेक्ट फुलप्रुफ असला पाहिजे ना. पण राज्याची बदनामी तुमच्या भ्रष्टाचारानं केली, अशी जळजळीत टीका पटोलेंनी यावेळी केली.

अलीकडील पावसामुळे प्रकल्पाच्या काही भागांबाबत चर्चा सुरू झाली असून, त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. दरम्यान, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या दर्जाबाबत विरोधी पक्षाकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही