Share

Budget Car | बाजारामध्ये 8 लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत ‘या’ शानदार कार

🕒 1 min read Budget Car | टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या ऑटोमोबाईल सेक्टर (Automobile Sector) मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी अनेक कार (Car) उत्पादक कंपन्या आपल्या कार दिवसेंदिवस अपडेट करून ग्राहकांसाठी त्याचे सर्वोत्तम व्हेरियंट सादर करत आहे. त्यामुळे आता देशांतर्गत ऑटोमोबाईल मार्केटमध्ये कार निवडणे खूप कठीण झाले आहे. कार खरेदी करताना बजेट आणि … Read more

Published On: 

🕒 1 min read

Budget Car | टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या ऑटोमोबाईल सेक्टर (Automobile Sector) मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी अनेक कार (Car) उत्पादक कंपन्या आपल्या कार दिवसेंदिवस अपडेट करून ग्राहकांसाठी त्याचे सर्वोत्तम व्हेरियंट सादर करत आहे. त्यामुळे आता देशांतर्गत ऑटोमोबाईल मार्केटमध्ये कार निवडणे खूप कठीण झाले आहे. कार खरेदी करताना बजेट आणि मायलेज या दोन्ही गोष्टीबाबत चांगले पर्याय शोधला जातात. बहुतांश लोकांना बजेटमुळे कार घेणे रद्द करावे लागते. मात्र, बाजारामध्ये कमी बजेटमध्ये देखील शानदार कार उपलब्ध आहे. तुम्ही जर बजेट फ्रेंडली कार शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 8 लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या कारबद्दल माहिती सांगणार आहोत. बाजारामध्ये पुढील कार 8 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

मारुती ब्रेझा

मारुतीची मारुती ब्रेझा ही एसयूव्ही 1.5L पेट्रोल इंजिनद्वारे समर्थ आहे. जी 103PS पॉवर आणि 137Nm टार्क जनरेट करते. त्याचबरोबर या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील जोडलेले आहे. या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, हेड्स-अप-डिस्प्ले आणि सनरूफ इत्यादी फीचर्स उपलब्ध आहे. बाजारामध्ये लवकरच या गाडीची सीएनजी (CNG) आवृत्ती येण्याची शक्यता आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये एवढी आहे.

टाटा नेक्सॉन

टाटा नेक्सॉन बाजारामध्ये दोन इंजिन पर्यायसह उपलब्ध आहे. या दोन्ही इंजिन मध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6-स्पीड AMT पर्याय उपलब्ध आहे. या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स, रियर-व्ह्यू कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि ISOFIX चाइल्ड-सीट अँकर इत्यादी आकर्षक फीचर्स आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 7.70 लाख रुपये आहे.

हुंडई वेन्यू

ह्युंडाईचा या कारमध्ये 1.2L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 83PS पॉवर आणि 114Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या कारमध्ये 1.5L डिझेल इंजिन पर्याय म्हणून उपलब्ध आहे. या कारमध्ये 6-स्पीड iMT, 6- स्पीड ऑटोमॅटिक आणि 7- स्पीड पर्यायी (ड्युअल क्लच ऑटोमॅटिक) पर्याय उपलब्ध आहेत. हुंडई वेन्यू या कारची एक्स-शोरूम किंमत 7.62 लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Technology Cars And Bike

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या