Share

“राज्यसभा नाही, आता लोकसभेची तयारी”; नवनीत राणा अ‍ॅक्शन मोडवर!

राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांनंतर नवनीत राणांनी स्पष्ट भूमिका मांडत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याचे सांगितले.

Published On: 

Navneet Rana

Navneet Rana : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे. “मी इतकी कमजोर नाही की राज्यसभेसाठी कोणाच्या दारावर जाईल,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी नवनीत राणांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून (MVA) कोणीही अर्ज न भरल्यामुळे राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (National Congress Party) उमेदवारी देण्यात आली आणि त्यांची बिनविरोध निवड झाली.

यानंतर नवनीत राणा राज्यसभा तिकिटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटी घेत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. या टीकेला उत्तर देताना नवनीत राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“मी 2024 मध्ये तिकिटासाठी कोणाच्या दारात गेले नाही. राज्यसभेसाठीही मी कोणाकडे मागणी केली नाही. पद येतात आणि जातात, पण माझी विचारधारा कायम राहील,” असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे आभार मानले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी पूर्ण कंबर कसली आहे, मी मैदानात उभी आहे, आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात असल्याने पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली होती. या घडामोडींनंतर नवनीत राणांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना सुरुवात झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही