Share

Hot Water Bath | गरम पाण्याने अंघोळ करणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

🕒 1 min read Hot Water Bath | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण गरम पाण्याने अंघोळ करत असतो. हिवाळ्यामध्ये थंडीचे वातावरण असल्यामुळे थंड पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पण तुम्हाला माहित आहे का? थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. होय! खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला … Read more

Published On: 

🕒 1 min read

Hot Water Bath | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण गरम पाण्याने अंघोळ करत असतो. हिवाळ्यामध्ये थंडीचे वातावरण असल्यामुळे थंड पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पण तुम्हाला माहित आहे का? थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. होय! खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, त्याचे गंभीर तोटे देखील होऊ शकतात. जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला पुढील तोट्यांना सामोरे जाऊ लागू शकते.

शरीर सुस्त होऊ शकते

हिवाळ्यामध्ये जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने आपले शरीर सुस्त होऊ शकते. परिणामी तुम्हाला दिवसभर थकवा आणि झोप येऊ शकते. गरम पाण्याने अंघोळ केल्यावर शरीराला खूप आरामदायी वाटते. मात्र, जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास थकवा आणि झोपेची समस्या निर्माण होऊ शकते.

उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते

जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील रक्तदाब अचानक वाढू शकतो. त्यामुळे हृदयरोगाशी संबंधित समस्या असलेल्या रुग्णांनी गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे.

कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होऊ शकते

गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. तुम्ही जर खूप गरम पाण्याने अंघोळ केली तर त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते. परिणामी त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढते. त्यामुळे तुम्ही जर जास्त गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने अंघोळ करत असाल, तर तुम्ही आंघोळीनंतर त्वचेला चांगले मॉइश्चरायझ केले पाहिजे.

केसांसाठी हानिकारक ठरू शकते

जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. गरम पाण्याने केस धुतल्यास केसांमध्ये कोरडेपणाची समस्या निर्माण होते. जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास केस कोरडे आणि कुरळे होण्याची शक्यता अधिक असते.

टीप: वरील माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही