Nana Patole | राज्यपालांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर नाना पटोले म्हणाले, “त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना…”

Nana Patole | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshyari) यांनी आज दिली आहे.

“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही” असे कोश्यारी म्हणाले आहेत. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्याच्या इच्छेबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “राज्यपालांवर भाजपचा मोठा आशीर्वाद होता. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान करणं त्यांना सगळ्यांना आवडत होतं. म्हणून उद्या जाण्याऐवजी हटवलं पाहिजे. त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना हटवलं पाहिजे. अशा प्रकारच्या विचारांच्या व्यक्तीची महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून गरज नाही.”

पुढे ते म्हणतात, “संविधानिक व्यवस्थेच्या एका राज्याचे आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर ते बसलेले होते. परंतु सातत्याने संविधानिक व्यवस्थेचाही अपमान करणं, या राज्याच्या महापुरुषांचा अवमान करणं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने अवमानात्मक बोलणं, अशा व्यवस्थेच्या राज्यपालांना तातडीने हटवावे.”

त्याचबरोबर काँग्रेसने अनेकदा राज्यपालांबद्दलची भूमिका स्पष्ट केली असल्याचं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. राज्यपाल भवन भाजपा भवन झालं, अशा पद्धतीच्या आम्ही भूमिका मांडल्या आहेत. राष्ट्रपतींकडे आम्ही लेखी तक्रारी केल्या असल्याचं नाना पटोले यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button