Share

CJP आंदोलनावर फडणवीसांचा हल्लाबोल; ‘राजकीय पक्ष पोळी भाजत आहेत’

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करत आंदोलनात अराजक प्रवृत्ती आणि राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला.

Published On: 

CM Devendra Fadnavis

मुंबई: NEET पेपरफुटीच्या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर काल दिल्ली पोलिसांनी आक्रमकपणे लाठीचार्ज (Lathicharge) केला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही क्रूरपणे लाठीमार करण्यात आल्याने पोलीस प्रशासन (Police) आणि केंद्र सरकारवर (Centre Government) सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पोलिसांची बाजू सावरली आहे. त्यांनी असा दावा केला की, पोलिसांनी अत्यंत संयम बाळगला आणि आंदोलन योग्यरित्या हाताळण्यासाठी केवळ आवश्यक तीच कारवाई केली. त्यांनी कोणत्याही सरकारला आपल्याच नागरिकांवर लाठीमार करण्याची इच्छा नसते. मात्र, काल पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले नसते, तर अनेक अनुचित प्रकार घडू शकले असते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. (CJP Protest on Delhi JantarMantar)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. फक्त संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबतच संविधानाने सोपवलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्वक आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनांना पोलिसांकडून परवानगीही दिली जाईल आणि अशी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र जाणीवपूर्वक राजकीय अस्थिरता निर्माण करण्याकरता विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे हो योग्य नाही. अशा लोकांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल.”

“आपण कोणतेही आंदोलन बघितले तर ज्यावेळी आंदोलनाला चेहरा नसतो, तेव्हा काही वेगळ्या प्रवृत्ती त्या आंदोलनात घुसत असतात. अशा प्रवृत्ती आंदोलनांचा फायदा घेऊन, आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले स्वार्थ कसे पूर्ण करता येतील, याचा प्रयत्न करत असतात. दिल्लीमध्ये काल आंदोलन झाले, त्यामध्येही अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल, यासाठी प्रयत्न करत आहेत.” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दिल्लीतील आंदोलनांबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि त्यात सहभागी असलेल्या राजकीय पक्षांवर कडक शब्दांत टीका केली. “अनेक अशा संघटना ज्या संघटनांचा या विषयाशी कसलाही संबंध नाही, त्या संघटनाही अराजकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दिल्लीत जे आंदोलन झाले ते नेतृत्वहीन होते, ज्यामुळे पोलीस वाहनांची तोडफोड आणि दगडफेक यांसारख्या घटना घडल्या. मी सर्वच आंदोलनकर्त्यांवर आरोप करत नाही, यात काही विद्यार्थी नक्कीच प्रामाणिकपणे आंदोलन करत असतील, परंतु बारकाईने पाहिल्यास असे दिसून येते की, परीक्षेशी कोणताही वास्तविक संबंध नसलेली काही मंडळी या आंदोलनात घुसली होती, त्यांना अराजकता निर्माण करायची होती, असा आरोप फडणवीस यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही