Share

NEET आंदोलनावरून काँग्रेस आक्रमक; दिल्लीत डॉ. नितीन राऊत पोलिसांच्या ताब्यात

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान डॉ. नितीन राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Published On: 

Dr. Nitin Raut

नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congres) मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानाबाहेर धरना आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले असताना उत्तर नागपूरचे काँग्रेस आमदार व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी नीट पेपर लीकविरोधात विद्यार्थ्यांनी काढलेल्या संसद मार्चदरम्यान पोलिसांनी लाठीचार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पंतप्रधान निवासाबाहेर धरना आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी डॉ. नितीन राऊत राहुल गांधी यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना अडविले. पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही तसेच जोरजबरदस्तीने धक्काबुक्की करत बसमध्ये बसवून ताब्यात घेतले. डॉ. राऊत यांच्यासह काही आंदोलक नेत्यांना पोलिसांच्या बसमध्ये बसवून दिल्लीतील विविध भागांत फिरविण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या सीमेवरील जाफरपूर कला पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

पंतप्रधान निवासाबाहेरील धरना आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, के. सी. वेणुगोपाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह विविध राज्यांतील काँग्रेस नेते आणि खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते.

डॉ. नितीन राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस ठामपणे उभी असल्याची भूमिका यापूर्वीही व्यक्त केली होती. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या बसमधून त्यांचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये ते आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नांविरोधात भूमिका मांडताना दिसत आहेत.

डॉ. नितीन राऊत यांची आक्रमक भूमिका

​या धडक आंदोलनात महाराष्ट्रातून विशेष उपस्थिती लावत उत्तर नागपूरचे ज्येष्ठ आमदार डॉ. नितीन राऊत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. केंद्रातील सत्तेविरोधात एल्गार पुकारत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका बजावली. सरकार दडपशाहीच्या जोरावर हा जनआक्रोश दाबू शकत नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

पोलिसांच्या ताब्यात असताना बसमधील डॉ. नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते अत्यंत आक्रमकपणे केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आपला आवाज बुलंद करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा असलेला नागपूरचा हा बुलंद आवाज दिल्लीत पोलिसांच्या कैदेत असला, तरी सरकार कितीही दडपशाही करो, हा जनआक्रोश आता गप्प बसणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव कुणाल राऊत यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

राहुल गांधींना ताब्यात घेणे म्हणजे लोकशाहीवर आघात – डॉ. नितीन राऊत

दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदार तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आंदोलनादरम्यान ताब्यात घेतल्याच्या घटनेचा उत्तर नागपूरचे आमदार व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तीव्र निषेध केला आहे. डॉ. राऊत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेणे ही लोकशाहीची गळचेपी आहे.

जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा मार्ग स्वीकारणे हे केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचे द्योतक आहे. राहुल गांधी यांना ताब्यात घेऊन सरकार लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेला हा लढा कोणत्याही दडपशाहीने थांबणार नाही. काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही