Rahul Gandhi : देशाच्या भविष्यावर, म्हणजेच विद्यार्थ्यांवर हल्ले होत असताना आपण गप्प बसायचं का? विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा थेट प्रत्येक भारतीय कुटुंबावर झालेला हल्ला असल्याची घणाघाती टीका आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
या कारवाईच्या निषेधार्थ राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. कोणतंही उत्तर न देता किंवा याच्या परिणामांना सामोरं न जाता आपण सहज सुटून जाऊ, असा पंतप्रधान मोदींचा समज असेल; पण यावेळी तसं अजिबात होणार नाही, असा स्पष्ट आणि थेट इशारा त्यांनी दिला आहे.
Rahul Gandhi Protest : विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी पंतप्रधानांच्या घराबाहेर धरणे
ज्यांना असं मनापासून वाटतं की विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय आणि त्यांना न्याय मिळायला हवा, त्या प्रत्येक देशभक्त भारतीयाने पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर होणाऱ्या आमच्या धरणे आंदोलनात सामील व्हावे, असं आवाहन राहुल गांधींनी सोशल मीडियावरून केलं आहे. भारताच्या विद्यार्थ्यांचा आवाज आता कुणालाही दाबता येणार नाही, तो दुर्लक्षित करता येणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- शरद पवार जंतर-मंतरवर; अभिजित दीपकेंची घेतली भेट
- दिल्लीत विद्यार्थ्यांचे रौद्र आंदोलन; राहुल-प्रियंका मैदानात, मोदी निवासाबाहेर काँग्रेसचे धरणे
- NEET Protest in Delhi: रक्ताळलेले विद्यार्थी आणि दडपशाहीचे मॉडेल, सत्तेचा अहंकार लोकशाहीला गिळणार का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











