Sharad Pawar : देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे का आणि सामान्य माणसाचं लक्ष भरकटवण्यासाठी सरकार मुद्दाम नवे वाद निर्माण करतंय का? राज्याच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामतीत यावर थेट आणि सविस्तर भाष्य केलं आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल, वाढती महागाई, विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी बारामती दौऱ्याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे पवारांनी केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
Sharad Pawar on PM Modi Baramati Visit & Shiv Sena Symbol
सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरू असल्यामुळे, या विषयावर बोलताना पवारांनी अत्यंत सावध भूमिका घेतली. “सध्या तरी मी काहीच सांगू शकत नाही, कारण सुनावण्या अजून संपलेल्या नाहीत,” असं सांगत त्यांनी आठ-दहा दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे, महागाईच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत जात असून कुटुंबप्रमुखांना घर चालवणं अवघड होऊन बसलं आहे; पण या मूळ दुखण्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच सरकारच्या सहमतीने जाणीवपूर्वक नवे विषय समोर आणले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर बोट ठेवलं. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास प्रशासकीय यंत्रणेलाच हस्तक्षेप करावा लागेल अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान केवळ अर्थव्यवस्थेचं सुंदर चित्र रंगवण्यात मग्न असून, मूळ वास्तवाकडे त्यांचं अजिबात लक्ष नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याबाबत विचारलं असता पवार म्हणाले, ‘देशातील पहिल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’ची पाहणी करण्यासाठी मोदी येणार असून, त्यासाठी १६ ऑक्टोबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे, पण त्यात थोडा बदल होऊ शकतो,’ अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, वाढलेले साखरेचे दर आणि आयात धोरणांवर चिंता व्यक्त करत त्यांनी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळाला पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीने भीषण स्वरूप धारण केले असून, पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे सर्वांनी मिळून या संकटाचा मुकाबला करण्याची गरज त्यांनी शेवटी अधोरेखित केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! जरांगेंच्या आंदोलनात शोककळा; अंतरवाली सराटीत 40 वर्षीय आंदोलकाचा मृत्यू
- मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; आज अनेक जिल्ह्यांत बंदची हाक
- महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट; 13 जिल्ह्यांना अलर्ट, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











