मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते पार्थ पवार (Parth Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पार्थ पवार यांनी शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन त्यांची भेट घेतली आणि या दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीमुळे राज्यातील राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
Parth Pawar meets Sharad Pawar
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भेट बुधवारी रात्री ८ वाजता सुरू झाली आणि जवळपास तीन तास चालून रात्री ११ वाजता संपली. आपापल्या राजकीय गटांमधील प्रमुख चेहरे असलेल्या या आजोबा-नातूंच्या जोडीने राजकीय विषयांवर चर्चा केली असण्याची दाट शक्यता आहे.
या भेटीचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात, शरद पवार गट सत्ताधारी आघाडीत सामील होऊ शकतो आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र (विलीनीकरण) येऊ शकतात, अशी चर्चा जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर, तीन तास चाललेल्या या बैठकीत अशा विलीनीकरणाच्या संभाव्य अटी व शर्तींबाबत सविस्तर चर्चा झाली असावी, असा कयास लावला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए (NDA) मध्ये सामील होऊन सरकारचा भाग बनू शकते, अशी चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटातील खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. ही भेट त्यांच्या मतदारसंघांशी आणि राज्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झाल्याचे सांगण्यात आले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांचा मोठा दावा; “17 सप्टेंबरनंतर मोठा उलगडा, मोदी PM राहणार नाहीत”
- Gen Z वर मोदी सरकारचा फोकस; केंद्रीय मंत्री विद्यार्थ्यांच्या थेट भेटीला जाणार
- ऑपरेशन टायगरनंतर पुन्हा धक्का; उद्धव ठाकरेंचे 9 नगरसेवक भाजपमध्ये जाणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











