Share

संजय राऊतांचा मोठा दावा; “17 सप्टेंबरनंतर मोठा उलगडा, मोदी PM राहणार नाहीत”

संजय राऊतांनी दावा केला की नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत आणि 17 सप्टेंबरनंतर याबाबत मोठा उलगडा होईल.

Published On: 

Sanjay Raut on PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्या मताशी मी सहमत आहे. किंबहुना, मी हेच तर सतत सांगत आलो आहे. थांबा, वाट पाहा, १७ सप्टेंबरनंतर एक मोठा उलगडा होणार आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान राहणार नाहीत आणि अमित शाह पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकीत राऊत यांनी केले आहे. या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut on PM Narendra Modi

येत्या एक वर्षाच्या आत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावे लागेल, असे राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हटले. यावरून संजय राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

संजय राऊत म्हणाले की, “मी गेले काही दिवस काय सांगतो? मी गेले काही महिने हेच सांगत आहे. पंतप्रधान हे त्यांची टर्म पूर्ण करत नाही. त्यांना वाईट परिस्थितीत पद सोडावे लागेल. तुम्हाला 17 सप्टेंबर नंतर उलगडा होईल,”

“१७ सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा वाढदिवस आहे. त्यामुळे अंधभक्तांनी उड्या माराव्यात, पार्ट्या कराव्यात. अमित शाह देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत. मोदी पायउतार झाल्यावर आहे काय? एकावर एक फ्री आहे.” असे संजय राऊत म्हणाले.

“माझ्याकडे जी काही माहिती आहे किंवा राहुल गांधी जे सांगतात. आमच्यासमोर जे काही तथ्य येतात, त्यानुसार मी सांगत आहे. लालकिल्ल्यावर मोदींचे शेवटचे भाषण होते. पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसही शेवटचा असेल. हे मी सर्व जागतिक स्तरावर जे चित्र आहे, त्यानुषंगाने बोलत आहे,” असेही राऊत यांनी सांगितले.

राम मंदिर दानचोरी प्रकरणावरही संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणात चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. चोरांनी चोरायला सोडायचे हे चालले आहे. चंपत राय आणि अनिल मिश्रा सर्वत्रच आहेत. महाराष्ट्रातही आहेत. त्यांना सोडले असले तरी आमचे आंदोलन संपणार नाही. मोरगाव येथे आमचे आंदोलन आहे. मी स्वत: आंदोलनात भाग घेण्यासाठी जात आहे, असे संजय राऊत म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही