दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन सुरू आहे. सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यानच्या गोंधळानंतर, मंगळवारी देशभरातील अनेक प्रमुख नेते जंतर-मंतरवर दाखल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दुपारी आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यकर्ते अभिजित दीपके (Abhijit Dipke) यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.
भेटीनंतर बोलताना शरद पवार यांनी नमूद केले की, दिल्लीतील या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. त्यांनी सांगितले की, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा आवाहनाशिवाय सोमवारी महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये उत्स्फूर्तपणे आंदोलने झाली.
”दीपके यांना कोणती मदत पाहिजे, किती दिवस त्यांना हे आंदोलन चालू ठेवायचं आहे?” असेही पवारांनी अभिजित दीपके यांना विचारले. दीपके म्हणाले की, ”मागच्या महिन्याभरापासून आमचे आंदोलन सुरु आहे. आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे आहे, नीट परिक्षेमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत पाहिजे.” यासह इतर मागण्यांचा उल्लेख दीपके यांनी केला.
दरम्यान, सोनम वांगचुक यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असूनही त्यांनी आपले उपोषण चालूच ठेवले आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपोषण सुरूच ठेवण्याचा आपला निर्धार पुन्हा व्यक्त केला. दीपके यांचे आंदोलनही सुरूच आहे आणि देशभरातून लोक मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर जमा होत आहेत.
या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पक्षाचे इतर खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी उपस्थित राहिले आहेत. सायंकाळी ४ च्या सुमारास मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी तेथे पोहोचले. काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिल्लीत विद्यार्थ्यांचे रौद्र आंदोलन; राहुल-प्रियंका मैदानात, मोदी निवासाबाहेर काँग्रेसचे धरणे
- NEET Protest in Delhi: रक्ताळलेले विद्यार्थी आणि दडपशाहीचे मॉडेल, सत्तेचा अहंकार लोकशाहीला गिळणार का?
- पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य; ‘पेपरफुटीवर राजकारण नको’, दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही













