Share

Rahul Gandhi | लग्न करण्यासाठी राहुल गांधींनी ठेवली ‘ही’ अट; म्हणाले, “मुलगी…”

Rahul Gandhi | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo News) माध्यमातून देशभरातील विविध भागांना भेटी देत आहेत. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या प्रवास आणि फूड चॅनल कर्लिटेल्ससोबतच्या मजेदार संभाषणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये राहुल गांधींनी त्यांचा डाएट, वर्कआउट, आवडती डिश आणि लग्नाविषयी सांगितले आहे. यात त्यांनी जीवनसाथी कसा हवा याबद्दल सांगत जोडीदारासाठी अटी देखील ठेवल्या आहेत.

“लग्नाच्या प्लॅनवर राहुल गांधी म्हणाले, मी लग्नाच्या विरोधात नाही. माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं होतं ते खूप सुंदर नातं होतं. माझ्यासाठी कोणतीही चेकलिस्ट नाही तर फक्त एक प्रेमळ आणि बुद्धिमान जीवनसाथी असावा”, असं ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी दाढी काढण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर खूप दबाव येत असल्याचे देखील सांगितले.

राहुल गांधी यांनी जेवणासाठी त्यांचे आवडते ठिकाण देखील सांगितले आहे. राहुल गांधी यांचे जेवणासाठीचे आवडते ठिकाण जुनी दिल्ली आहे. मोती महल, सागर, स्वागत, सरवण भवन ही त्यांची आवडती रेस्टॉरंट्स आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Rahul Gandhi | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo News) माध्यमातून …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics