ठाकरे गटात खळबळ! भास्कर जाधवांचा थेट स्वपक्षाला ‘घरचा आहेर’, कारवाईची तयारी ठेवत मोठा गौप्यस्फोट

भास्कर जाधव यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे. पक्षात फूट पडण्यामागे केवळ बाह्य दबाव नाही, तर अंतर्गत त्रुटीही कारणीभूत असल्याचे ते म्हणाले आहेत.

Published On: 

MLA Bhaskar Jadhav speaking about Shiv Sena UBT internal issues

मुंबई – आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवून कारवाईला सामोरे जाण्याची हिंमत किती नेत्यांमध्ये असते? सध्या शिवसेना ठाकरे गटात असाच एक मोठा राजकीय भूकंप घडला आहे. पक्षातील आक्रमक नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी थेट स्वपक्षालाच ‘घरचा आहेर’ दिला आहे. खासदार फुटण्यामागे केवळ बाह्य दबाव नाही, तर पक्षातही काही त्रुटी आणि संवादाचा अभाव असल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

पक्षात पडलेली फूट आणि नेत्यांची नाराजी यावर बोलताना जाधवांनी अत्यंत परखड मते मांडली. ‘टाळी एका हाताने वाजत नाही’, असे म्हणत त्यांनी पक्षांतर्गत उणिवांकडे लक्ष वेधले. तरुण फळीने आणि नेतृत्वाने आता बदल स्वीकारून अधिक सक्रिय होण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. सत्य बोलल्यामुळे कारवाई झाली तरी बेहत्तर, पण पक्षाच्या हितासाठी आत्मचिंतन गरजेचे असल्याचे त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले.

‘त्रासाला कंटाळून लोक बळी पडतात, प्रत्येकाची सहनशीलता नसते’

खासदारांवरील दबावाबाबत बोलताना जाधवांनी अतिशय वास्तववादी चित्र मांडले. संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक हे नेते तुरुंगात जाऊन आले, पण त्यांच्यावर काय आरोप सिद्ध झाले असा खडा सवाल त्यांनी विचारला. अजित पवारांवरही ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता, पण पुढे काहीच सिद्ध झाले नाही. यंत्रणांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून नेते दबावाला बळी पडतात, प्रत्येकामध्ये सगळं सहन करण्याची ताकद नसते, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

दुसरीकडे, पक्षप्रमुख भेटत नाहीत हा आरोप मात्र त्यांनी थेट खोडून काढला. उद्धव ठाकरे यांच्याकडची सुरक्षा व्यवस्था आता काढण्यात आल्यामुळे कुणीही जाऊन त्यांना सहज भेटू शकतं, असा दावा त्यांनी केला.

याच वेळी जाधवांनी पक्षांतर्गत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आपले साडू बाळ माने यांना पक्षात घेतल्यावर टीका करणाऱ्यांना (विनायक राऊत) त्यांनी ‘मूर्ख’ आणि ‘चमचे’ म्हटले आहे. बाळ माने यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यामध्ये आपला कोणताही सहभाग नव्हता. आपल्याला न विचारता हा निर्णय घेतला गेला हे एका अर्थी चांगलेच झाले, असा टोलाही त्यांनी लगावला. जाधवांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे आता ठाकरे गटात नेमकं काय राजकारण तापणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही