ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडणार? ‘त्या’ प्रश्नावर ओमराजे यांचं सूचक उत्तर

ठाकरे गटाचे ६ खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंसोबत असल्याच्या प्रश्नावर उत्तर टाळल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

Published On: 

Omraje Nimbalkar dodging question about staying with Uddhav Thackeray faction

पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी फूट पडणार का? उद्धव ठाकरे यांचे सर्वात निष्ठावंत समजले जाणारे नेतेही आता वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत का? सध्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत याच एका प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.

ठाकरे गटाचे तब्बल सहा खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याच्या बातम्यांनी राजकारण चांगलंच तापलं आहे. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नाव आघाडीवर आलं आहे. त्यांनी (Omraje Nimbalkar) आपण दिल्लीत असल्याचा इन्कार केला आहे. मात्र, एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर बरंच काही सांगून जाणारं आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या मौनाने वाढवला संभ्रम

तानाजी सावंत तुम्हाला दिल्लीला घेऊन गेले का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की आपण पुण्यातच आहोत आणि दिल्लीला गेलेलो नाही. पण, ‘तुम्ही अजूनही उद्धव ठाकरे गटासोबत आहात का?’ असा थेट प्रश्न विचारल्यावर मात्र ओमराजे निंबाळकर यांनी कोणतही स्पष्ट उत्तर देणं टाळलं. त्यामुळेच त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी संशय आणखी गडद झाला आहे.

दुसरीकडे, या संभाव्य फुटीच्या बातम्यांवरून शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आज सकाळीच खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन कडक इशारा दिला. मागे जे घडलं त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार असेल तर जनता शांत बसणार नाही, असा सज्जड दम राऊत यांनी भरला. असा नादानपणा खपवून घेतला जाणार नाही, असंही ते अत्यंत स्पष्टपणे म्हणाले.

ओमराजे हे ठाकरेंचे अत्यंत निष्ठावान शिलेदार मानले जातात. २००६ मध्ये वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते राजकारणात आले. शिवसेनेच्या साथीने ते एकदा आमदार आणि दोनदा खासदार झाले आहेत. त्यांचा तळागाळातील संपर्क अत्यंत दांडगा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय पाटील आणि संजय देशमुख हे खासदारही ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता आहे. या वृत्ताला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही, पण राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही