Share

नोकरी आणि लग्नाचे आमिष, डान्स बारमधून जाळे; भाजपच्या बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा

नोकरी आणि लग्नाच्या बहाण्याने एमबीए विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप. दहिसर भाजपचे महामंत्री सूरजप्रतापसिंह देवडा यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल.

Published On: 

Suraj Singh Devda - BJP leader booked in sexual assault case Mumbai

मुंबई– शिक्षण पूर्ण करून मुंबईत करिअरचे स्वप्न पाहणाऱ्या एका २३ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीच्या वाट्याला डान्स बार आणि लैंगिक शोषण येईल, याचा कुणी विचार तरी केला असेल का? इंदूरवरून मुंबईत आलेल्या या तरुणीसोबत असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून या तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर आरोप भाजपचे दहिसर पूर्व येथील महामंत्री सूरजप्रतापसिंह देवडा यांच्यावर झाला आहे. दहिसर पोलिसांनी देवडा यांच्यासह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून, आता हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

गुंगीचं औषध आणि खोटं लग्न

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये एका एजंटने एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या या तरुणीला नोकरीचे गाजर दाखवून मुंबईत बोलावले. पण इथे आल्यावर तिला थेट एका डान्स बारमध्ये ढकलण्यात आले. तिथेच तिची ओळख देवडा याच्याशी झाली.

सुरवातीला नोकरीसंदर्भात भेटण्याचे निमित्त करत देवडाने (Suraj Singh Devda) तिला बोलावून घेतले. त्यानंतर एका शीतपेयातून गुंगीचे औषध देत चालत्या गाडीत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

दुसऱ्या दिवशी जाब विचारताच देवडाने थेट लग्नाचे आश्वासन दिले. मात्र, २०२४ मध्ये तो आधीच विवाहित असल्याचे उघड झाले. दुसरीकडे, पत्नीला घटस्फोट देतो असे सांगून त्याने तरुणीकडून लाखो रुपये उकळले आणि तिला मारहाणही केली.

एका महिला आमदाराचे नाव वापरून तोंड बंद ठेवण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. ११ जून रोजी याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मनसेचे किरण नकाशे यांनी यावर कडाडून टीका करत भाजपच्या ‘संस्कृती’वर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यावर डॅमेज कंट्रोल करत भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी स्पष्ट केले की, देवडा याची पक्षातून तात्काळ हकालपट्टी केली आहे. खाजगी आयुष्यातील कृत्यांचा पक्षाशी संबंध जोडू नये, असेही ते म्हणाले. मात्र देवडा यांचे पियुष गोयल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांसोबतचे पक्षप्रवेशाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही